मदरसामध्ये लहान मुलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकास अटक; एकेकाळी स्वतःवरही झाले होते अत्याचार
मदरसामध्ये प्रार्थना आणि मोठ मोठी भाषणे देण्याच्या नावाखाली तो मुलांना थांबवून घेत असे. धार्मिकतेशी या गोष्टी निगडीत असल्याने इतके दिवस याचा कोणालाही संशय आला नाही.
केरळ (Keral) यथे पोलिसांनी मशिदी समितीने केलेल्या आरोपानुसार गेल्या दोन वर्षांपासून अनेक मुलांचा लैंगिक अत्याचार करणाऱ्या, एका 63 वर्षीय मदरसा शिक्षकला अटक केली आहे. यूसुफ असे या शिक्षकाचे नाव असून, तो अलुवाचा (Aluva) रहिवासी आहे. केरळच्या कोट्टयममधील थालाओलापारांबू (Thalayolaparambu) येथील स्थानिक मशिदीमध्ये गेल्या दोन वर्षांपासून तो शिक्षक म्हणून काम करत आहे. मदरसामध्ये (Madarsa) प्रार्थना आणि मोठ मोठी भाषणे देण्याच्या नावाखाली तो मुलांना थांबवून घेत असे. धार्मिकतेशी या गोष्टी निगडीत असल्याने इतके दिवस याचा कोणालाही संशय आला नाही.
दोन आठवड्यांपूर्वी, जेव्हा युसुफने स्वतःच्या खाजगी खोलीत पवित्र कुरान शिकवण्याच्या बहाण्याने, एका लहान मुलाचा छळ केला तेव्हा त्याचे कारनामे उघडकीस आले. पिडीत मुलगा जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या वागण्यात झालेला बदल त्याच्या पालकांच्या लक्षात आला. मुलाला त्यांनी खोदून विचारल्यावर त्याने घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पालकांनी ताबडतोब मदरसामध्ये धाव घेऊन मशिदीच्या अधिकाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. त्यानंतर घडलेल्या घटनेबाबत स्थानिक पोलिसांकडे तक्रार केली. (हेही वाचा: लहान मुलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास आता होणार मृत्युंदड)
अखेर पोलिसांनी 27 मे रोजी कोडुंगल्लूर येथून त्याला पकडले. युसुफने लैंगिक छळ केलेल्या मुलांची संख्या कळू शकली नसले तरी, पोलिस याबाबत मशिदी अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहेत; जेणेकरून इतर मुले असतीत तर ती समोर येतील. द न्यूज मिनिटच्या वृत्तानुसार, अटकेनंतर आरोपी शिक्षकाने 25 वर्षाचा असल्यापासून लहान मुलांचे लैंगिक शोषण करत असल्याचे कबूल केले आहे. युसुफचेदेखील लहानपणी लैंगिक शोषण झाले होते.