Odisha Shocking: पत्नीच्या जळत्या चितेवर उडी मारल्याने वृद्ध व्यक्तीचा मृत्यू

वडिलांच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने एका महिलेने वडिलांच्या जळत्या चितेवर उडी घेतली होती.

Fire | (Photo Credits: Pixabay)

पत्नीच्या जळत्या चितेवर उडी मारल्याने एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना ओडीशाच्या (Odisha) कालाहांडी (Kalahandi) येथील सिआलजोडी गावात मंगळवारी घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पत्नीच्या मृत्युचा विरह सहन न झाल्याने संबंधित व्यक्तीने असे धक्कादायक कृत्य केल्याची माहिती ग्रामस्थांनी पोलिसांना दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आस्कमित नोंद करून पुढील तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलामणी सबर (वय, 65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. निलामणी गावातील ग्रामपंचायत समितीचे माजी सदस्य होते. दरम्यान, निलामणी यांची पत्नी रायबडी (वय, 60) यांचे मंगळवारी वृद्धपकाळाने निधन झाले. रायबडी यांच्यावर अंतिम संस्कार केल्यानंतर परंपरेनुसार त्याचे चार मुले आणि नातेवाईक जलाशयात अंघोळीला गेले. त्याचवेळी निलामणीने रायबडी यांच्या जळत्या चितेवर उडी मारली. ज्यात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. हे देखील वाचा- Child Porn: लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी एकास अटक, तामिळनाडूच्या मदुराई येथील प्रकार

केगांव ठाण्यातील प्रभारी निरीक्षक दामू पराजा यांनी सांगितले की, या घटनेची माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनास्थळी उपस्थित असलेल्या मृताच्या नातेवाईकांची आणि शेजाऱ्यांकडे विचारपूस केली. त्यानंतर पोलिसांनी आक्समित मृत्यूची नोंद केली. पत्नीच्या मृत्युचा विरह सहन न झाल्याने संबंधित व्यक्तीने टोकाचे पाऊल उचलेले आहे, असे निर्दशनास येत आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

याआधी राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातून अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. वडिलांच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने एका महिलेने वडिलांच्या जळत्या चितेवर उडी घेतली होती. या घटनेत संबंधित महिला 70 टक्के भाजली होती. ही घटना यावर्षी मे महिन्यात घडली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif