Zydus Cadila ची ZyCoV-D, COVID-19 Vaccine सुरूवातीच्या टप्प्यात महाराष्ट्र,बिहार सह या '7' राज्यातच असेल उपलब्ध
निडल फ्री अॅप्लिकेटर देखील प्रति डोस 93 रूपयांनी दिला जाणा र आहे.
Zydus Cadila कडून विकसित करण्यात आलेली ZyCoV-D ही कोविड 19 लस देशात सुरूवातीच्या टप्प्यात केवळ 7 राज्यांमध्ये उपलब्ध करून दिली जाणार आहे. सात राज्यांमध्ये बिहार, झारखंड, महाराष्ट्र, पंजाब, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल यांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. Central Drugs Standard Control Organization (CDSCO)कडून या लसीला मर्यादित स्वरूपात आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. ही लस 12 आणि त्यावरील वर्षांच्या मुलांना देण्यात येणार आहे.
सध्या भारत सरकार कडून प्रति डोस 265 रूपयाप्रमाणे एक कोटी लसी विकत घेतल्या आहेत. निडल फ्री अॅप्लिकेटर देखील प्रति डोस 93 रूपयांनी दिला जाणा र आहे. सध्या केंद्र सरकारने त्यांनी निवडलेल्या 7 राज्यांमधील अशा जिल्ह्यांना प्राधान्य द्यायचं ठरवलं आहे जेथे लसीचा पहिला डोस घेतल्याचेही प्रमाण कमी आहे. हे देखील वाचा: ZyCOV-D Vaccine डेल्टा वेरिएंटवर प्रभावशाली; 56 दिवसांत घ्यावे लागणार 3 डोसेस.
राज्य सरकारला सध्या Pharmajet injectors वापराबद्दल संबंधित कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याचे आदेश दिले आहेत. Pharmajet हे नीडल फ्री अॅप्लिकेटर आहे. यामध्ये painless intradermal vaccine देता येऊ शकतं. ZyCoV-D ही देशातील पहिली DNA plasmid coronavirus vaccine आहे. ही लस रोगप्रतिकार क्षमतेच्या दृष्टीने सुरक्षित लस आहे.
भारतामध्ये सध्या कोवॅक्सिन, कोविशिल्ड आणि स्फुटनिक वी या तीन लसी उपलब्ध करून दिल्या आहेत. आता पर्यंत अंदाजे 123 कोटी जणांना कोविड 19 लसी देण्यात आल्या आहेत.