Year Ender 2020: 'या' महत्त्वपूर्ण गोष्टींमुळे राजकीय क्षेत्रासाठी हे वर्ष ठरले अस्थिरतेचे

Major Political Events in The Year 2020 | (photo credit - fB and PTI, twitter)

सन 2020 हे सरतं वर्ष (Year Ender 2020) निरोप घेतल आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये आपण 2021 या नव्या कोऱ्या वर्षाचे स्वागत (Happy New Year 2021) करणार आहोत. अशा वेळी 2020 या वर्षाला कोरोना व्हायरस सारख्या मगामारीने पुरते झोपवून टाकले असले तरी, विविध क्षेत्रांसाठी हे वर्ष कसे ठरले याचे आढावा घेण्याची खूमखूमी काही केल्या जात नाही. अशाच काही क्षेत्रांपैकी एक म्हणजे राजकीय क्षेत्र. 2020 हे वर्ष राजकीय क्षेत्रासाठी बरेचसे अस्थिरतेचे ठरले. या वर्षांमध्ये सरकारने निर्माण झाली. कोसळली. नेते रुसले, फुटले आणि नवनव्या पक्षांमध्ये प्रवेशकर्ते झाले. अशाच काही घटनांचा हा मागोवा.

मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ (काँग्रेस) सरकार पडले

जवळपास 15 वर्षांच्या शिवराज सिंह चौहान यांच्या रुपात असलेल्या भाजप सरकारला धक्का देत कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार आले. परंतू, सुरुवातीपासूनच काँग्रेसमध्ये कमलनाथ की ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यात असलेला संघर्ष पुढे टोकाला गेला. परिणामी ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजप प्रवेश केला आणि कमलनाथ सरकार कोसळले. आता या राज्यात शिवराज सिंह चौहान यांच्या रुपात भाजप सरकार सत्तेत आहे. (हेही वाचा, Baba Vanga's Predictions For 2021: बाबा वैंगा यांची भविष्यवाणी- 2021 मध्ये जग करेल प्रलयाचा सामना)

मणिपूरमध्ये भाजपची तडजोड सरकार

मणिपूर राज्यात यंदा राजकीय संघर्ष पाहायाल मिळाला. याठिकाणी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला बहुमतापेक्षा 10 जागा कमी मिळाल्या. ही कमी भरुन काढण्यासाठी भाजपने स्थानिक पक्षांना हाताला धरुन सत्तेचा मार्ग शोधला. इतके की काँग्रेसला धोबिपछाड दिला आणि काही आमदारांनाही भाजपवासी करुन घेतले. त्यामुळे सर्वात मोठा विरोधी पक्ष असूनही काँग्रेसला विरोधी पक्षात बसावे लागले.

राजस्थानमध्ये सचिन पायलट यांचे उडालेले विमान काँग्रेसमध्येच स्थिरावले

मध्य प्रदेशप्रमाणेच राजस्थानमध्येही संघर्ष पाहायला मिळाला. अशोक गहलोथ यांच्या रुपात असलेल्या काँग्रेस सरकारला सुरुंग लावण्याचे प्रयत्न झाले. परंतू, मुरब्बी गहलोथ यांनी आपले मैदान राखले. इथेर काँग्रेस नेते सचिन पायलट आणि अशोक गहलोथ यांच्यात संघर्ष पाहायला मिळाला. सचिन पायलय यांनी काँगेरसमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला परंतू त्यात त्यांना विशेष असे यश आले नाही.

काँग्रेस नेत्यांचे पक्ष आणि ज्येष्ठांची आदळआपट

काँग्रेस पक्षाचा वारंवार होत असलेला पराभव पाहून ज्येष्ठ नेत्यांध्ये चांगलीच नाराजी आहे. ही नाराजी काँग्रेसमधील 23 नेत्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलेल्या पत्रातून बाहेर आली. हे पत्र प्रसारमाध्यमातून बाहेर आल्याव सुरुवातील काँग्रेसने हात झटकले. असे काही पत्रच आले नाही असे सांगितले. परंतू, नंतर असे पत्र आल्याचा खुलासा केला. या पत्रावर पक्षश्रेष्ठी आणि काँग्रेस वर्किंग कमेटी यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीतून फार काही निष्पण्ण झाले नाही. परंतू, काँग्रेसमध्ये अद्यापही काही धुगधुगी आहे हे पाहायला मिळाले. शिवाय प्रसारमाध्यमांना मसाला मिळाला ते वेगळे.

शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर

राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएचा संस्थापक सदस्य असलेल्य पक्षांपैकी एक शिरोमणी अकाली दल बाहेर पडला. केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी विधेयकावरुन शिरोमनी अकाली दल आणि सराकर यांच्यात मतभेद निर्माण झाले. त्यातून अकाली दल बाहेर गेला.