World Water Day 2019: धोका ओळखा, पाणी वाचवा; अन्यथा पृथ्वीवर जीवसृष्टीचा विनाश अटळ
तर, मोठ्या प्रमाणावर येणारा पूर आणि त्यात कोट्यवधी टीएमसी वाहून जाणारे पाणी हीसुद्धा एक मोठी समस्या आहे. पावसाळ्यात आलेल्या महापुरात असंख्य लिटर पाणी पुरात वाहून जाते. हे वाहून जाणारे पाणी म्हणजे आमचे जलव्यवस्थापन किती कमजोर आहे याचाच एक नमूना आहे
World Water Day 2019: जगात जर तिसरे महायुद्ध झाले तर, ते पाण्यासाठी होईल असा विचार काही विचारवंतांनी कधीचाच बोलून दाखवला आहे. गेल्या काही काळातील इतिहास पाहिला तर त्यात तथ्य वाटते आहे. पाणी ही सर्वांचीच गरज आहे. आज अवघे जग पाणी या मुद्द्यावरुन चिंतेत आहे. स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाण्याचे प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणावर घटताना दिसत आहे. आपल्या निष्काळजीपणामुळे समुद्रातील पाणी पातळीही कमालीची वाढते आहे. ही पातळी वाढत असली तरी, त्याचा मानवाला मात्र काहीच फायदा होणार नाही. कारण, ते पाणी पिण्यायोग्य मुळीच नसते. पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अस्तित्वच मुळी पाण्यावर अवलंबून आहे. हेच पिण्यायोग्य असलेले स्वच्छ पाणी जर मिळणे कठीन झाले तर, केवळ मानवी समूहच नव्हे तर या पृथ्वीवरील संर्व जीवसृष्टीच विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे, असे म्हणावे लागले.
पाणी हा भारतातील गंभीर मुद्दा
स्वच्छ आणि पिण्यायोग्य पाणी या मुद्द्यावर भारतात मोठी गंभीर स्थिती आहे. गेल्या वर्षी (2018) प्रसिद्ध झालेला एक अहवाल सांगतो की, देशातील 16 राज्यांत जमीनीतील पाणीपातळीत धोकादायक रासायनिक पदार्थांचे प्रमाण आढळून आले आहे. जमीनीतील पाणी पातळीतही मोठी घट होत आहे. उदाहरणच द्यायचे तर हिमाचल प्रदेश राज्यातील शिमला आणि इतर अनेक असे जिल्ह्ये आहेत जिथे गावांतील एक मोठा समूह पाण्याच्या शोधात दिवसातील कित्येक तास वाया घालवतो. केवळ पाण्याच्या अभावामुळे देशभरातील शेकडो लोकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. दुष्काळ पडल्यामुळे शेतकरी पेरणी करु शकत नाही. कधी केलेली पेरणी वाया जाते. असे असूनही आम्ही पाण्याच्या बचतीवर काहीही ठोस उपाय करायला तराय नाही आहोत. आमच्या एकूण विचारांच्या अजेंडावर हा विषय नाहीच जसे काही.
दुष्काळात पाणीच नाही तर, पावसाळ्यात कोट्यवदी टीएमसी पाण्याचा अपव्याय
भारतात केवळ दुष्काळ हीच पाण्याची मोठी समस्या नाही. तर, मोठ्या प्रमाणावर येणारा पूर आणि त्यात कोट्यवधी टीएमसी वाहून जाणारे पाणी हीसुद्धा एक मोठी समस्या आहे. पावसाळ्यात आलेल्या महापुरात असंख्य लिटर पाणी पुरात वाहून जाते. हे वाहून जाणारे पाणी म्हणजे आमचे जलव्यवस्थापन किती कमजोर आहे याचाच एक नमूना आहे. भविष्यातील धोके ओळखून आताच नियोजन करायचे तर जलव्यवस्थापन हा मुद्दा गांभीर्याने घेत आताच काहीतरी पावले उचलायला हवीत. जेणेकरुन भविष्यात पाण्याच्या थेंबासाठी होणारा संघर्ष टळू शकेल. (हेही वाचा, World Water Day 2019: यंदा ‘Leaving no one behind’ थीमवर साजरा होणार जागतिक जल दिन)
समाजाची स्वावलंबनाची विचारधारा संपली - राजेंद्र सिंह
जलपुरुष अशी ख्याती असलेले जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह सांगतात की, देशातील जवळपास 90 शहरं ही जलमुक्त झाली आहेत. हा बाब या शहरांच्या भवितव्यासाठी प्रचंड धोकायादयक आहे. या शहरांची स्थिती अफ्रिकेतील केपटाउन या ठिकाणापेक्षाही कितीतरी भयानक आहे. पाण्याच्या समस्येमुळे लोकाचे जीवन आजार, लाचारी आणि बेकारीकडे झुकलेले पाहायला मिळते. बारमाही पाणीटंचाई ही समाजाचे भविष्य अंधारात असल्याचे दाखवणारे द्योतकच आहे. पाणीटंचाईची स्थिती पाहून असे वाटते की, आज समाजाची स्वावलंबनाची विचारधाराच संपली आहे की काय. आजचा समाज हा केवळ सरकार सापेक्षी ठरला आहे. जो परावलंबीत्वाकडे वाटचाल करतो आहे. या कारणामुळेच आज आम्हाला भिषण पाणीटंचाई आणि दुष्काळसदृश्य स्थितीचा सामना करण्यासाठी प्रवृत्त करत आहे. समाज केवळ जलव्यवस्थापनासाठी सरकारच्या तोंडाकडे पाहात असल्यामुळे पाणी टंचाई ही अधिक तीव्र झाल्याचेही राजेंद्र सिंह सांगतात.