Woman Cuts Off Husband's Private Part: दिल्लीत घरगुती वादातून महिलेने कापले पतीचे गुप्तांग; आरोपी पत्नी फरार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उत्तर दिल्लीतील रूप नगर भागातील आहे. 1 नोव्हेंबर रोजी एका तरुणाने फोन करून माहिती दिली की, पत्नीने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

Crime News | Pixabay.com

Woman Cuts Off Husband's Private Part: दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरगुती वादातून पत्नीने पतीचा प्रायव्हेट पार्ट (Woman Cuts Off Husband's Private Part) कापून घटनास्थळावरून पळ काढला. याबाबत पतीने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, पत्तीने हा गुन्हा का केला? यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण उत्तर दिल्लीतील रूप नगर भागातील आहे. 1 नोव्हेंबर रोजी एका तरुणाने फोन करून माहिती दिली की, पत्नीने त्याचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमी व्यक्तीला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (हेही वाचा -MP: पतीच्या निधनानंतर गर्भवती महिलेला साफ करायला लावले रक्ताने माखलेले बेड, नर्सिंग ऑफिसर आणि वॉर्ड बॉयला बजावली नोटीस)

पीडित व्यक्तीची प्रकृती ठीक असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस सध्या त्याच्या लेखी तक्रार मिळण्याची वाट पाहत आहेत. आरोपी पत्नी या गुन्ह्यानंतर फरार असून तरुणाचे म्हणणे व लेखी तक्रारीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिस सध्या फरार महिलेचा शोध घेत आहेत. (हेही वाचा - MP Shocker: मध्य प्रदेशातील भिंडमध्ये स्वयंपाक करताना गरम तेलाच्या कढईत पडला मोबाईल, स्फोट झाल्याने एका व्यक्तीचा मृत्यू)

काही महिन्यांपूर्वी दिल्लीतील डाबरी भागात एका महिलेने पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह खोलीत लपवून तिने घटनास्थळावरून पळ काढला होता. द्वारका जिल्ह्यातील डाबरी भागात ही घटना घडली. येथे पत्नीने पतीचा खून केला आणि घराला बाहेरून कुलूप लावून महिला फरार झाली होती. या संपूर्ण घटनेची माहिती दिल्ली पोलिसांना 20 ऑगस्ट रोजी मिळाली.

यानंतर पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी घराचा दरवाजा उघडला. घरामध्ये कुजलेल्या अवस्थेत एक मृतदेह पडलेला होता. पोलिसांनी त्याची ओळख पटवली असता हा मृतदेह सचिन नावाच्या तरुणाचा असल्याचे समजले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement