Bank Merger: देशातील 10 बँकांचे एकत्रिकरण झाल्याने सामान्य माणसावर त्याचा कसा होईल परिणाम? जाणून घ्या सविस्तर

या संदर्भात रिजर्व बँकने अधिसूचना जारी केली आहे. ज्यात त्यांनी 1 एप्रिल 2021 मध्ये इलाहाबाद बँकेची सर्व शाखा इंडियन बँकेत समाविष्ट होतील असे सांगितले आहे.

Bank (Photo Credits: IANS)

आजपासून म्हणजेच 1 एप्रिलपासून देशातील 10 बँकांचे एक मेगा मर्जर (Mega Merger) होणार आहे. या प्रक्रिया 10 बँकांचे एकत्रिकरण होऊन केवळ 4 बँका राहणार आहेत. या बँकांच्या यादीत, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स (Oriental Bank of Commerce) आणि यूनाइटेड बँक ऑफ इंडिया चे पंजाब नेशनल बैंक (PNB) मध्ये, सिंडिकेट बँक चे केनरा बँकमध्ये, आंध्रा बँक व कॉर्पोरेशन बँक चे यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये आणि इलाहाबाद बँकचे इंडियन बँक मध्ये एकत्रिकरण होणार आहे. या संदर्भात रिजर्व बँकने अधिसूचना जारी केली आहे. ज्यात त्यांनी 1 एप्रिल 2021 मध्ये इलाहाबाद बँकेची सर्व शाखा इंडियन बँकेत समाविष्ट होतील असे सांगितले आहे.

त्याचबरोबर ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स व युनायटेड बँक ऑफ इंडियाची सर्व शाखा पंजाब नॅशनल बँकेत समाविष्ट होतील. यासाठी सरकारने सार्वजनिक क्षेत्रात चार बँकांमध्ये 14,500 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.हेदेखील वाचा- सुकन्या समृद्धी योजना, PPF सारख्या सरकारी लहान बचत योजनांवरील व्याजदर जैसे थे, कपातीचा निर्णय नजरचूकीने; Nirmala Sitharaman ची ट्वीट द्वारा माहिती

चेकबुक

ज्या बँकांचे एकत्रिकरण होत आहे, त्यांचे चेकबुक 1 एप्रिलपासून मान्य होणार नाही. यामुळे त्या ग्राहकांना एंकर बँक (ज्या बँकेत विलयीकरण झाले आहे ते) चे नवे चेकबुक बनवावे लागेल. आधीच्या बँकेची चेकबुक आता ग्राह्य धरली जाणार नाही.

बँकांकडून मिळू शकतात काही सवलती

काही बँका चेकबुक संदर्भात काही काळासाठी सवलत देऊ शकते. कारण RBI ने काही बँकांना पुढील 1-2 महिन्यांपर्यंत जुने चेक बुक्स वापरण्याची परवानगी दिली आहे. उदाहरणार्थ सिंडिकेट बँक ग्राहक आपले जुने चेक बुक 30 जूनपर्यंत विलयीकरण झालेल्या बँकेत करु शकतो.

पैशाचा व्यवहार

विलयीकरण झाल्यानंतर काही बँकांना IFSC आणि MICR कोड बदलले जातील. तर काही बँकांचे बदलणार नाही. प्रत्येक बँकेचे मायग्रेशन वेगवेगळे असते. अशा वेळी ग्राहकांनी आपल्या बँकेशी संपर्क साधावा. ज्यानुसार, त्यांना लोन आणि जीवन बीमा आणि म्युच्युअल फंड संदर्भात ECS निर्देशांना बदलणे गरजेचे होईल.

जमा आणि लोन

जर तुम्ही विलय होणा-या बँकेकडुन लोन घेतले असेल, तर ती बँक ज्या बँकेत विलय झाली आहे ती बँक ही प्रक्रिया पुढे चालू ठेवेल. काही बँकांना नवे अपडेट नियम, अटी असू शकतात.

एटीएम कार्ड्स

बरेच ग्राहक आपले जुन्या कार्डची वैधता संपेपर्यंत ते वापरु शकतात. त्यानंतर त्यांना नवीन बँकेचे एटीएम कार्ड घ्यावे लागतील. याबाबत सध्या तरी मुख्य बँकांनी काही नोटिफिकेशन दिलेले नाहीत.

जुन्या पासबुक आणि चेकबुक मध्ये बदल

या विलयीकरणामुळे जुन्या पासबुक आणि चेकबुक मध्ये बदल होऊ शकतात. त्याचे IFSC कोड, ब्रांच कोडमध्ये सुद्धा बदल होतील. त्यामुळे त्वरित आपण विलयीकरण झालेल्या बँकेत जाऊन ते बदल करुन घ्यावेत.

FD, RD रेटमध्ये सध्यातरी काही बदल नाही

मेगा मर्जरनंतर एंकर बँकनुसार डिपॉजिट रेट/लेंडिंग रेट/आरडी रेट लागू होतील. तथापि, ज्यांचे पहिल्यापासून FD आहे त्यांना ते मॅच्युअर होईपर्यंत व्याज मिळत राहिली, ज्या दरावर त्यांनी FD ओपन केली होती. असेच RD बाबत असेल.

अकाउंट नंबर, कस्टमर ID मध्ये बदल

विलयीकरण झाल्यानंतर बँकांचे अकाउट नंबर आणि कस्टमर्स आयडी नंबर नवे मिळतील. यामुळे एटीएम कार्ड, नेट बँकिंगमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

ग्राहकांनी काय करावे?

वरील सर्व अडचणींपासून सुटका करून घ्यायची असेल तर तात्काळ एंकर बँकांना कॉल करुन वा त्या बँकांमध्ये जाऊन सर्व माहिती घ्यावी. तसेच त्यांचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अपडेटेट आहे की नाही याची खात्री करुन घ्यावी. ज्यामुळे बँकेमध्ये होणारे सर्व बदल त्यांना त्वरित समजतील.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now