पंजाब येथे शेतकऱ्यांच्या सुरु असलेल्या आंदोलनामुळे Western Railway च्या काही स्पेशल ट्रेन रद्द, येथे पहा संपूर्ण लिस्ट

भारतीय रेल्वे (फोटो सौजन्य-फेसबुक)

पंजाब (Punjab) येथे शेतकऱ्यांकडून गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे पश्चिम रेल्वे प्रशासनाला मोठ्या संख्येने काही ट्रेन रद्द कराव्या लागत आहेत. शेतकऱ्यांचे 1 ऑक्टोंबर पासूनच ट्रेन रोको आंदोलन सुरु झाले आहे. ऐनसणासुदीच्या काळात पश्चिम रेल्वेकडून दिवसागणिक ट्रेन रद्द किंवा शॉर्ट टर्मिनेटड कराव्या लागत आहेत. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचण्यापूर्वी रेल्वेकडून बदल करण्यात आलेल्या ट्रेनच्या वेळापत्राकडे लक्ष द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.(Indian Railways: सणासुदीच्या काळात प्रवाशांना भारतीय रेल्वेकडून भेट; ऑक्टोबर-नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये चालवणार 200 अतिरिक्त गाड्या)

पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी ट्रेन मध्ये करण्यात आलेल्या बदलासंदर्भात एक परिपत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सणासाठी चालवल्या जाणाऱ्या स्पेशल ट्रेन आणि शॉर्ट टर्मिनेट करण्यात आलेल्या ट्रेन संदर्भात अधिक माहिती दिली आहे.(Festival Special Trains: दिवाळी-दसरा सणासाठी पश्चिम रेल्वे 'या' मार्गांवर चालवणार 24 विशेष रेल्वे गाड्या)

दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेत पास झालेले कृषि विधेयक बिल याच्या विरोधात शेतकऱ्यांकडून आंदोलने केली जात आहेत. तर पंजाब मध्ये शेतकऱ्यांनी रेल्वे रोकोची घोषणा केली आहे. याच कारणास्तव शेतकऱ्यांचे आंदोलन पाहता पश्चिम रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्या रद्द केल्या आहेत. याआधी सुद्धा बहुतांश गाड्या रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.