Gangrape: तुरुंगात असलेल्या आमदार विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णू मिश्रा याच्यावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल
आमदारपूत्र विष्णू मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबातीलच एक विकास मिश्रा याने त्या तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने विरोध केला असता तीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. जीव वाचविण्यासाठी ती मुंबईला गेली. पीडितेने सांगितले की, या काळात तिच्या मनात अन्यायाविरुद्धची भावना बळावली आणि तिने न्यायासाठी तक्रार केली.
उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) भदोही (Bhadohi ) येथील ज्ञानपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार विजय मिश्रा (MLA Vijay Mishra) हे सध्या तुरुंगात आहेत. दरम्यान, विजय मिश्रा यांचा मुलगा विष्णु मिश्रा (Vishnu Mishra) यांच्यावरही बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. ऑर्केस्ट्रामध्ये काम करत असलेल्या वाराणसी येथील एका तरुणीने आमदार आणि त्यांच्या मुलावर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. तरुणीने दावा केला आहे की, आमदार आणि त्यांच्या समर्थकांच्या भीतीने काही काळ तिने वाराणसी सोडून मुंबईला स्थलांतर केले. दरम्यान, तरुणीच्या तक्रारीवरुन आमदारासह त्यांचा मुलगा आणि इतर तिघांवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
भदोही येथील पोलीस अधिकक्षक राम बदन सिंह यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, तरुणाने दिलेल्य माहितीनुसार, लोकसभा निवडणूक 2014 मध्ये तक्रारदार तरुणी आणि तिच्या पथकाला प्रचार-प्रसार करण्यासाठी बोलावण्यात आले होते. त्यावेळी आमदारांनी तरुणीसोबत आक्षेपार्ह वर्तन केले. (हेही वाचा, Rape in Lockup: 5 पोलिसांकडून लॉकअपमध्ये 10 दिवस बलात्कार, 20 वर्षीय महिलेचा मध्य प्रदेश पोलिसांवर गंभीर आरोप)
दरम्यान, आमदारपूत्र विष्णू मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबातीलच एक विकास मिश्रा याने त्या तरुणीवर बलात्कार केला. तरुणीने विरोध केला असता तीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. जीव वाचविण्यासाठी ती मुंबईला गेली. पीडितेने सांगितले की, या काळात तिच्या मनात अन्यायाविरुद्धची भावना बळावली आणि तिने न्यायासाठी तक्रार केली.
गोपीगंज पोलीस स्टेशन प्रमुख कृष्णानंद राय यांनी सांगितले की, आमदार विजय मिश्रा याचा मुलगा विष्णू मिश्रा यांच्या विरुद्ध भादंसं कलम 376,342 आणि 506 अन्वये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडितेला वैद्यकीय चाचणी करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. इतर आरोपींना लवकरच अटक केले जाईल, असेही कृष्णानंद राय यांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून आमदार मिश्रा यांच्यावर सातत्याने टीका होत आहे. विविध आरोप होत आहेत. मिश्रा यांच्या नातेवाईकांनी त्यांच्यावर मालमत्ता ढापल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातच आमदार विजय मिश्रा यांना अटक करण्यात आली आहे. सध्या त्यांची रवानगी आगरा जेलमध्ये आहे. दरम्यान, विजय मिश्रा यांच्या पत्नी रामलली मिश्र यांना मलमत्ता प्रकरणात उच्च न्यायालयातून जामीन मिलाला आहे. तर त्यांच्या मुलगा विष्णु मिश्रा फरार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)