Lion Lioness Name Controversy: सिलीगुडी सफारी पार्कमध्ये सिंह 'अकबर', सिंहिण 'सीता', नावावरुन वाद; विहिंपची कोलकाता न्यायालयात धाव
त्यावरुन विश्व हिंदू परिषद (VHP) द्वारा वनविभागाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे.
पश्चिम बंगाल (West Bengal Safari Park) राज्यातील सिलीकुडी सफारी पार्क (Siliguri's Safari Park) येथे सिंह आणि सिंहिणीला देण्यात आलेली नावे आणि त्यांना एकत्र ठेवल्याच्या कारणावरुन वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगाल (West Bengal) वन विभागाने सिलीगुडी येथील सफारी पार्कमध्ये एका सिंहाचे नाव 'अकबर' आणि सिंहिणीचे नाव 'सीता' असे ठेवले आहे. त्यावरुन विश्व हिंदू परिषद (VHP) द्वारा वनविभागाविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या बंगाल शाखेने 16 फेब्रुवारी रोजी कोलकाता उच्च न्यायालयाच्या जलपायगुडी येथील सर्किट बेंचशी संपर्क साधला. या प्रकरणाची सुनावणी 20 फेब्रुवारी (मंगळवारी) होणार आहे.
सफारी पार्कचे संचालक पक्षकार
सिंहांना अलीकडेच त्रिपुरातील सेपाहिजाला प्राणी उद्यानातून स्थलांतरित करण्यात आले आणि 13 फेब्रुवारी रोजी सिलीगुडीच्या सफारी पार्कमध्ये एकत्र ठेवण्यात आले. मात्र त्यांच्या नावावरुन वाद निर्माण झाल्यानंर या प्रकरणात राज्याच्या वन विभागाचे अधिकारी आणि बंगालच्या सफारी पार्कचे संचालक यांना या प्रकरणात पक्षकार करण्यात आले आहे. 'अकबर' आणि 'सीता'ची जोडी एकाच आवारात जोडणे हिंदूंच्या भावनांचा अपमान करणारे आहे, असे विहिंपचे म्हणणे आहे. 'अकबर' हे मुघल सम्राटाचे नाव असून वाल्मिकींच्या 'रामायण' मधील 'सीता' ही पूज्य हिंदू देवता असल्याचे विहिंपचे म्हणने आहे. LiveLawने याबाबत वृत्त दिले आहे. (हेही वाचा, सहा सिंहींणींसोबत एकटी चालतेय तरूणी; वायरल व्हिडिओ पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क (Watch Viral Video) .)
विहिंपकडून नावात बदल करण्याची मागणी
विहिंपचे म्हणणे आहे की, सिंहांना ही नावे देण्याचा वनविभागाचा निर्णय अयोग्य आहे. खास करुन 'सीता' या नावाला जोडलेले धार्मिक महत्त्व लक्षात घेता हिंदूंच्या भावनांचा आदर करण्यासाठी सिंहीणीच्या नावात बदल करण्याची विनंती संघटनेने केली आहे. या वादावर प्रतिक्रिया देताना वनविभागाने सांगितले की, सिंहांना अलीकडेच त्रिपुरातील सेपाहिजाला प्राणी उद्यानातून हलवण्यात आले होते. ही त्यांची पूर्वीचीच नावे आहेत. त्यामुळे 13 फेब्रुवारीला सफारी पार्कमध्ये आल्यावर त्यांचे नाव बदलण्यात आली नाहीत. (हेही वाचा, Lions on Stroll in Gujarat: गुजरातच्या Amreli मध्ये वर्दळीच्या हायवे वर सिंहीण बछड्यांसोबत दिसली फिरताना; व्हिडिओ वायरल)
एक्स पोस्ट
अकबर हा मुघल सम्राट होता. सीता ही वाल्मिकीच्या 'रामायण' मधील एक पात्र आहे आणि हिंदू देवता म्हणून पूज्य आहे असे सांगतानाच VHP ने असा दावा केला आहे की राज्याच्या वन विभागाने सिंहांना नावे दिली आहेत. 'अकबर' सोबत 'सीता' जोडणे हिंदूंचा अनादर आहे. वन विभागाने सिंहीणीचे नाव बदलावे. विहिंपने वनविभागाच्या निर्णयामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे विभागाने तातडीने आपला निर्णय मागे घ्यावा आणि नावांमध्ये तत्काळ बदल करावा. दरम्यान, कोर्टाच्या सुनावणीत काय होते याबाबत उत्सुकता आहे.