उत्तराखंड: पूरग्रस्तांसाठी मदत घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला उत्तरकाशी येथे अपघात; दोघांचा मृत्यू

या महापूराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान कार्यरत आहेत. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरसुद्धा या मदतकार्याचाच एक भाग होते.

Helicopter Crash in Uttarakhand Flood (Photo Credits: ANI)

उत्तराखंड राज्यातील पूरग्रस्त (Uttarakhand Flood) नागरिकांसाठी मदत आणि बचावकार्य साहित्या घेऊन जाणाऱ्या एका हेलिकॉप्टरला अपघात झाला आहे. या अपघातात दोघे जण ठार झाले आहेत. हे हेलिकॉब्टर देहरादून (Dehradun) येथून पूरग्रस्तांसाठी राशन घेऊन मोलडी ते अराकोट असे निघाले होते. दरम्यान, उत्‍तरकाशी (Uttarkashi) येथे या हेलिकॉप्टरला अपघात झाला. यात पायलट, को-पायलट आणि एसडीआरएफ जवानासह तीन लोक प्रवास करत होते. ही घटना बुधवारी घडली.

प्राप्त माहितीनुसार, मदत आणि बचावकार्यात व्यग्र असताना या हेलिकॉप्टरचा वीजेच्या तारांना स्पर्श झाला. त्यामुळे हा अपघात घडला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर हे हैरिटेज एव्हिएशनचे होते. हे हेलिकॉप्टर बचाव आणि मतदकार्यासाठी वापरण्यात येत होते. या अपघातानंतर एसडीएम देवेंद्र नेगी यांनी सांगितले की, हेलिकॉप्टरमथून एकूण तीन लोक प्रवास करत होते. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, एक गंभीर जखमी आहे. जखमीला नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा, नेपाळ येथे हेलिकॉप्टर कोसळून, पर्यटन मंत्र्यांसह सहा जण ठार)

एएनआय ट्विट

एएनआय ट्विट

उत्तराखंड राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी महापूर आला आहे. या महापूराने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांना मदत करण्यासाठी एनडीआरएफ आणि लष्कराचे जवान कार्यरत आहेत. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरसुद्धा या मदतकार्याचाच एक भाग होते.