उत्तर प्रदेश: तांत्रिकासोबत सेक्स करण्यासाठी नकार दिल्याने नवऱ्याने केली बायकोची हत्या

अलीगड (Aligarh) येथे तांत्रिकासोबत सेक्स करण्यासाठी नकार दिल्याने नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

अलीगड (Aligarh) येथे तांत्रिकासोबत सेक्स करण्यासाठी नकार दिल्याने नवऱ्याने बायकोची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी नवऱ्याला अटक केली असून त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे.

मनपाल सिंह असे या व्यक्तीचे नाव असून पेशाने तो इंजिनिअर आहे. मनपाल याला जलद मार्गाने पैसे कमवण्याचे भूत त्याच्या डोक्यात शिरले होते. यासाठी त्याने एका भोंदू बाबाला याबद्दल सांगितले. त्यावेळी भोंदू बाबाने मनपाल याला त्याच्या पत्नीसोबत सेक्स करण्यासाठी परवानगी दे असे सांगितले. या गोष्टीवरुन मनपाल याने पत्नीला तांत्रिकासोबत सेक्स करण्यासाठी जबरदस्ती केली. मात्र पत्नीने या गोष्टीसाठी नकार दिल्याने मनपाल संतप्त झाला.

(TikTok च्या अतिवापरामुळे बायकोवर चिडला नवरा, महिलेने विष पिऊन संपवले आयुष्य)

तसेच मनपाल याने पत्नीने नकार दिल्यामुळे तिला जबरदस्त मारहाण केली. नंतर नदीत बुडून तिला मारुन टाकले. या प्रकरणी पोलिसांनी मनपाल याला अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif