अहमदाबाद: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांचे कुटुंबियांसह भारतामध्ये आगमन; सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर PM नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत
डोनाल्ड ट्र्म्प यांच्या स्वागतासाठी भारताचे पंताप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प (US President Donald Trump) यंचे कुटुंबियांसह गुजरात मधील अहमदाबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले आहे. दरम्यान आज (24 फेब्रुवारी) आणि उद्या (25 फेब्रुवारी) अशा दोन दिवसीय ट्र्म्प यांच्या दौर्यासाठी अहमदाबाद आणि दिल्लीमध्ये जय्यत तयारी आणि चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. डोनाल्ड ट्र्म्प यांच्या स्वागतासाठी भारताचे पंताप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासह महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्र्म्प यांचे गळाभेट घेऊन स्वागत केले. भारतामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचे आगमन होण्यापूर्वी काही वेळापूर्वी त्यांनी ट्विटर हॅन्डलवरून हिंदी भाषेत ट्वीट करत आपण भारत दौर्यासाठी उत्सुक असून लवकरच भेट होणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान अहमदाबाद विमानतळावरून ट्र्म्प आणि मोदी यांचा भव्य रोड शो सुरू होणार आहे. 22 किमीच्या या रोड शोमध्ये 28 राज्यांचे चित्ररथ दाखवले जाणार आहेत. अहमदाबाद ते मोटेरा स्टेडियम दरम्यान पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. डोनाल्ड ट्रम्प भारत दौऱ्यासाठी 'बुखारा' रेस्टॉरंट मध्ये साकारण्यात येतंय खास 'Trump Platter'; गुजराती शाकाहारी पदार्थांची पर्वणी चाखणार अमेरिकन राष्ट्राध्यक्ष.
अहमदाबाद येथील रोड शो नंतर आज डोनाल्ड ट्र्म्प साबरमती आश्रमाला भेट देणार असून आजच आग्रा येथे ताजमहालाला देखील भेट देणार असल्याची चर्चा आहे. डोनाल्ड ट्र्म्प यांना आज रोड शोच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यातील 24 आणि 25 फेब्रुवारी या दोन्ही दिवसांचे संपूर्ण शेड्युल जाणून घ्या.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इवांका आणि जावई जेरेड हेदेखील उपस्थित आहेत. अशाप्रकारे कुटुंबियांसोबत भारत दौर्यावर येणारे डोनाल्ड ट्र्म्प हे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष आहेत. म्प यांच्या आगमनापूर्वी संपूर्ण रस्त्याची सॅटेलाईट स्क्रीनिंगही केली जाणार आहे. ट्रम्प कुटुंब भारतात आल्यानंतर त्यांना 5 टिअर सुरक्षा असणार आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी 25 हजार जवान तैनात करण्यात येणार आहेत.