US Lauds Indian Covid Management: भातामुळेच आम्ही COVID-19 महामारीतून बचावलो, मालदीवकडून भारताबद्दल कौतुकोद्गार

त्यांनी G20 शिखर (G20 Summit) परिषदेच्या भारताच्या अध्यक्षतेचे कौतुक करताना म्हटले आहे की, भारताने विकसनशील देशांपुढील आव्हानांवर प्रकाश टाकला आणि जगाचा दक्षिणेतील आवाज म्हणून स्वत:ची ओळखही निर्माण केली आहे.

Ahmed Khaleel | (Photo Credits: X)

Maldives Lauds Indian Covid Management: मालदीवचे परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री (MoS), अहमद खलील (Ahmed Khaleel) यांनी भारताचे जोरदार कौतुक केले आहे. त्यांनी G20 शिखर (G20 Summit) परिषदेच्या भारताच्या अध्यक्षतेचे कौतुक करताना म्हटले आहे की, भारताने विकसनशील देशांपुढील आव्हानांवर प्रकाश टाकला आणि जगाचा दक्षिणेतील आवाज म्हणून स्वत:ची ओळखही निर्माण केली आहे. मालदीव हा लहान बेटांचा देश आहे. असे असले तरी भारताच्या परराष्ट्र आणि शेजारी प्रथम धोरणाचा मालदीवला चांगलाच फायदा झाला आहे. खास करुन जागतिक पातळीवर दक्षिणेतील भारताच्या संबंधाचा, असे म्हणत त्यांनी भारताच्या पररष्ट्र धोरणाचे कौतुकही केले आहे.

भारताची परराष्ट्र निती आणि आर्थिक धोरणे, त्यासंदर्भातील लवचिकता तसेच वचनबद्धता अतिशय विश्वासार्ह आहे. त्यामुळे भारताला भविष्यात चांगली संधी आहे. पुढच्या 25 वर्षांमध्ये भारत हा जगातील सर्वात मोठी दुसरी अर्थव्यवस्था होईल. इतकी ताकद भारताने कमावली आहे. कोविड-19 महामारिमध्ये आम्ही मोठ्या संख्येने वाचलो याचे श्रेयसुद्धा आम्ही भारतालाच देतो, असेही अहमद खलील यांनी म्हटले आहे.

न्यूयॉर्क शहरात आयोजित ‘इंडिया-यूएन फॉर ग्लोबल साउथ: डिलिव्हरींग फॉर डेव्हलपमेंट’ या कार्यक्रमात अहमद खलील बोलत होते. जोर देत ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे अभिनंदन आणि कौतुक करण्याची संधी मला घ्यायची आहे. त्यांनी 18 व्या G20 शिखर परिषदेचे आयोजन केले. अशा प्रकारच्या परिषदेचे आयोजन करणे आमि त्यात सर्वांना सोबत घेऊन सर्वसहमतीची योजना आखणे, तशी घोषणा करणे हे आव्हानात्मक होते. तरी त्यांनी हे आव्हान पेलल्याचे ते म्हणाले.

ट्विट

भारताने संयुक्तर राष्ट्रांसोबत सुरु असलेली चर्चा कायम ठेवली आहे. बारत यूएन डेव्हलपमेंट पार्टनर फंड हा दक्षिणेकडील एक परस्पर सहकार्याची ब्लू प्रिंट आहे. ज्यामुळे अनेकांनी त्यांचे कौतुक केले आहे. ज्या ठिकाणी कालपर्यंत संसाधनांचा समतोल नव्हता अशा ठिकाणी आपण सामाजिक आणि भौतिक पायाभूत सविधांबाबत विचार करतो आहोत. आम्हाला आशा आहे की, संयुक्त राष्ट्र आयोगाच्या 62 व्या सत्राचे अध्यक्ष या नात्याने, भारत जागतिक दक्षिणेसाठी हवामान कृती, वित्त आणि शाश्वत विकास यासह महत्त्वाच्या मुद्द्यांवर जोर देत राहील, असेही खलील यांनी शेवटी सांगितले.