UP Shocker: ‘माझी पत्नी पदराआडून गुटखा खाते आणि घरभर थुंकते’; पतीची पोलिसांत तक्रार, घटस्फोटापर्यंत पोहोचले प्रकरण

अमित गौर म्हणाले की, महिलेच्या गुटखा खाण्याच्या सवयीमुळे त्यांचे लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे पतीला पत्नीने गुटखा खाणे बंद करावे असे वाटते, तर पत्नीला तसे करायचे नाही.

Husband-Wife Fight (PC- Pixabay)

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) आग्रा येथे एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे एका महिलेच्या गुटखा (Gutkha) खाण्याच्या व्यसनामुळे तिचे लग्न घटस्फोटापर्यंत पोहोचले आहे. आग्रा येथील 'फॅमिली काउन्सिलिंग सेंटर'मध्ये एका कुटुंबाने आपल्या सुनेवर गुटखा खात असल्याचा आरोप केला आहे. सुनेच्या गुटखा खाऊन इथे-तिथे थुंकण्याच्या सवयीला कुटुंब कंटाळले आहे. त्यांनी सुनेला खूप समजावले, परंतु तिच्यावर काहीही परिणाम झाला नाही. ती तिच्या पदराखाली गुटखा खात राहिल्याचे त्यांनी सांगितले.

महिलेच्या पतीने सांगितले की, पत्नी सकाळी उठल्याबरोबर डोक्यावरून पदर घेऊन आत गुटखा खाते आणि घरातील कामे करत इकडे तिकडे थुंकते. घरच्यांनी याचा अनेकदा विरोध केला, समजावूनही सांगितले, पण ती ऐकायला तयार नाही. या त्रासाला वैतागून पतीने त्याच्या पत्नीला सोडले. मात्र त्यानंतर आता महिलेने आपल्या पतीवर दुसऱ्या महिलेसोबत अवैध संबंध असल्याचा आरोप केला आहे.

रिपोर्टनुसार, छट्टा भागात राहणाऱ्या या तरुणीचे शाहगंज येथील तरुणाशी लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून ही महिला घरात गुटखा खायची आणि घरात इकडे तिकडे थुंकायची. याला कंटाळून पतीने तिला सोडले व आता हे प्रकरण पोलीस ठाण्यातून कुटुंब समुपदेशन केंद्रापर्यंत पोहोचले आहे. मात्र महिलेले आपल्याला मुलगा झाला नाही म्हणून सासरच्या लोकांनी आपल्याला मारहाण केली आणि बळजबरीने घराबाहेर हाकलून दिले, असा दावा केला आहे. (हेही वाचा: New Delhi Crime: केवळ पंधराशे रुपयांसाठी तरुणाची भोसकून हत्या)

या संपूर्ण प्रकरणाबाबत 'फॅमिली कौन्सिलिंग सेंटर'चे समुपदेशक डॉ. अमित गौर म्हणाले की, महिलेच्या गुटखा खाण्याच्या सवयीमुळे त्यांचे लग्न मोडण्याच्या मार्गावर आहे. एकीकडे पतीला पत्नीने गुटखा खाणे बंद करावे असे वाटते, तर पत्नीला तसे करायचे नाही. या प्रकरणाचा अजून निकाल लागलेला नाही. दाम्पत्याला पुढील तारीख देण्यात आली आहे.