UP Shocker: नवऱ्याने दाताने तोडला बायकोच्या नाकाचा लचका; मांसाचा तुकडा घेऊन पोहोचला पोलीस ठाण्यात, जाणून घ्या कारण
प्रभारी निरीक्षक अरुण कुमार सिंह यांनी सांगितले की, अद्याप कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेले नाही. तक्रार मिळाल्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाईल.
नवरा-बायकोचे भांडण (Husband-Wife Fight) हे कोणत्या टोकाला जाऊ शकते हे कोणी सांगू शकत नाही. ताजे प्रकरण उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीचे (Lakhimpur Kheri) आहे. इथे बायकोसोबतच्या भांडणात नवऱ्याने पत्नीला खूप मारहाण केली, एवढेच नाही तर त्याने पत्नीचे चक्क नाक कापले. कापलेल्या नाकाचा तुकडा घेऊन हा तरुण थेट फरधान पोलीस ठाण्यात पोहोचला. पोलीस ठाण्यात तरुणाच्या हातातील मांसाचा तुकडा पाहून पोलिसांना धक्काच बसला. यानंतर पोलिसांनी तरुणाला पकडून हैदराबाद पोलीस ठाण्यात आणले.
पत्नी त्याच्यासोबत सासरी परत येण्यास नकार देत होती, त्यामुळे आरोपी पतीने पत्नीचे नाक कापले. महिलेला लखीमपूर येथील ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे फरदान परिसरातील रतसिया गावातील संजय कुमारचे दुसरे लग्न दीड वर्षापूर्वी हैदराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील ढाकिया येथील रहिवासी शिवराम यांची 28 वर्षीय मुलगी वंदना हिच्याशी झाले होते.
संजयच्या पहिल्या पत्नीची हत्या झाली होती व त्यानंतर काही काळातच त्याने वंदनासोबत लग्न केले. मात्र, या लग्नानंतर पती-पत्नीमध्ये मतभेद सुरु झाल्याने झाल्याने वंदना तिच्या माहेरी राहत होती. पोलिसांनी सांगितले की, पत्नीला परत घेऊन जाण्यासाठी जेव्हा संजय ढाकिया येथे पोहोचला, तेव्हा पत्नीने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. पत्नीने नकार दिल्याने संतापलेल्या संजयने पत्नी वंदनाचे नाक कापले आणि ते घेऊन तो पोलीस ठाण्यात गेल्या व स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. (हेही वाचा: Crimes Against Women: राजधानी दिल्ली ठरले महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर; Mumbai दुसऱ्या स्थानावर- NCRB Report)
दुसरीकडे, जखमी महिलेला लखीमपूर येथील ट्रॉमा सेंटरमध्ये शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले आहे. प्रभारी निरीक्षक अरुण कुमार सिंह यांनी सांगितले की, अद्याप कोणीही पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आलेले नाही. तक्रार मिळाल्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाईल.