UP Shocker: भावाने केली अल्पवयीन बहिणीची हत्या; कापलेले शीर घेऊन रस्त्यावर फिरताना दिसला, समोर आला धक्कादायक व्हिडिओ (Watch)

रियाज असे आरोपीचे नाव आहे. सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी बहिणीचे छिन्नविछिन्न डोके आणि मृतदेह ताब्यात घेतला आहे. ही घटना फतेहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मिठवारा गावातील आहे.

Muder प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

उत्तर प्रदेशातील (UP) बाराबंकी (Barabanki) जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे भाऊ-बहिणीच्या वादाला अतिशय दुःखद वळण मिळाले आहे. या ठिकाणी एका भावाने बहिणीचा शिरच्छेद केला व त्यानंतर तिचे डोके हातात घेऊन तो गावात सुमारे 800 मीटर फिरला. ग्रामस्थांच्या माहितीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले. यानंतर आरोपी भावाला अटक करण्यात आली. एसीपी आशुतोष मिश्रा यांनी सांगितले की, आरोपी भावाला बहिणीच्या अफेअरचा राग होता व यामुळे त्याने बहिणीची हत्या केली.

सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा भाऊ बहिणीचे कापलेले डोके घेऊन पोलीस स्टेशनकडे जात होता, त्यावेळी कोणीतरी याचा व्हिडिओ बनवला.

रियाज असे आरोपीचे नाव आहे. सकाळी 11.30 वाजता ही घटना घडली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी बहिणीचे छिन्नविछिन्न डोके आणि मृतदेह ताब्यात घेतला आहे. ही घटना फतेहपूर पोलीस स्टेशन हद्दीतील मिठवारा गावातील आहे. शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी सकाळी रियाजचा त्याची बहीण असिफासोबत घरात वाद झाला. त्यानंतर काही वेळाने तो घराबाहेर पडला. त्यानंतर तो परत घरी आला व त्याने बहिणीला कपडे धुण्यास सांगितले. रियाजची बहीण कपडे धुण्यासाठी घराबाहेर आली आणि पाणी भरू लागली.

त्यावेळी मागून आलेल्या रियाजने बहिणीवर हल्ला केला. तिचा गळा चिरला जाईपर्यंत रियाझ असिफावर वार करत राहिला. यानंतर तो हातात तिचे डोके घेऊन पोलीस ठाण्याच्या दिशेने जाऊ लागला. त्याला एका शिरासोबत घराबाहेर जाताना आजूबाजूच्या लोकांनी पाहिल्यावर ते हादरले व तत्काळ पोलिसांना याबाबत कळवले. पोलिसांनी वाटेतच रियाजला अटक केली. (हेही वाचा: Manipur Women Naked Parade Case: मणिपूरमधील महिलेच्या विवस्त्र धिंडेच्या वायरल व्हिडिओ नंतर इंफाळ मध्ये महिलांनी जाळलं एका आरोपीचं घर)

माहितीनुसार, रियाजच्या बहिणीचे गावातील एका तरुणावर प्रेम होते. हे दोघे काही दिवसांपूर्वी घरातून पळून गेले होते. याबाबत 29 मे रोजी कुटुंबीयांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तरुण आणि तरुणी दोघांना गावाबाहेरून पकडले होते. तरुणाची रवानगी तुरुंगात करण्यात आली. तर मुलीला कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर रियाजचा बहिणीवरील राग आणखीनच वाढला होता.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement