UP Shocker: 80 वर्षांच्या वृद्ध महिलेवर दारूच्या नशेत नातेवाईकाने केला बलात्कार; आरोपीस अटक, गुन्हा दाखल
मात्र आता उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) समोर आलेली बलात्काराची (Rape) घटना पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल
याआधी अनेकदा महिलांवरील अत्याचारासाठी त्यांचे कपडे, त्यांचे वागणे-हावभाव यांना जबाबदार ठरवण्यात आले होते. मात्र आता उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) समोर आलेली बलात्काराची (Rape) घटना पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. यूपीच्या बदाऊनमध्ये (Budaun) एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे. येथे 80 वर्षांच्या वृद्ध महिलेला फसवून घरी नेवून एका नातेवाईकाने तिच्यावर बलात्कार केला आहे. ऐकायला ही घटना विचित्र वाटत असेल, परंतु पोलिसांच्या सुरुवातीच्या तपासात, बऱ्याच अंशी ही बाब खरी असल्याचे दिसून आले.
महिलेच्या स्टेटमेंटच्या आधारावर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर रात्री उशिरापर्यंत पोलीस आरोपींचा शोध घेत होते. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी युवकाने नात्याने आपली आजी लागणाऱ्या या वृद्ध महिलेस रात्रीच्या जेवणाच्या बहाण्याने फसवून घरी नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. आरोपीच्या तावडीतून सुटून वृद्ध महिला कशीबशी घरी पोहोचली आणि कुटुंबातील सदस्यांना ही घटना सांगितली. त्यानंतर ताबडतोब कुटुंबीय तिला पोलीस ठाण्यात घेऊन गेले.
सुरुवातीला पोलिसांनाही या गोष्टीवर विश्वास बसला नाही, मात्र नंतर त्यांनी प्राथमिक तपासानंतर आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता या महिलेची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. पोलीस त्या रात्री उशिरापर्यंत आरोपींचा शोध घेत होते. ही घटना 1 ऑगस्ट रोजी घडली आणि आरोपीला काही तासातच अटक करण्यात आली. अहवालानुसार, ज्यावेळी या महिलेवर बलात्कार झाला त्यावेळी आरोपीने दारू प्यायली होती व तो नशेत होता. (हेही वाचा: Uttar Pradesh Gangrape: शेतात शौच करण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार)
आता आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला पकडले आणि त्याला तुरुंगात पाठवले आहे. त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. वृद्ध महिलेची मानसिक आणि शारीरिक स्थिती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.