Pakistan च्या विजयाचा आनंद साजरा करणे पडले महागात, संतापलेल्या नवऱ्याने बायकोच्या विरोधात दाखल केला FIR
त्यावेळी भारताचा पराभव झाला आणि पाकिस्तान संघाचा विजय झाला. परंतु पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे.
टी20 वर्ल्ड कप 2021 मध्ये भारताच्या विरोधात पाकिस्तानचा सामना पार पडला. त्यावेळी भारताचा पराभव झाला आणि पाकिस्तान संघाचा विजय झाला. परंतु पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. कारण संतापलेल्या नवऱ्याने तिच्या विरोधात FIR दाखल केला आहे. हे प्रकरण उत्तर प्रदेशातील रामपुर येथील आहे. टी20 वर्ल्ड कपच्या या सामन्यात महिला आणि तिच्या घरातल्या मंडळींनी पाकिस्तानचा संघ जिंकल्याने कथित रुपात फटाके फोडले होते. ऐवढेच नव्हे तर पाकिस्तानच्या समर्थनार्थ व्हॉट्सअॅप स्टेटस सुद्धा ठेवले होते.
पोलीस अधिकाऱ्याने म्हटले की, महिला आणि तिच्या नातेवाईकांच्या विरोधात तिच्याच नवऱ्याने एफआयआर दाखल केला आहे. व्यक्तीच्या तक्रारीवरुन पोलीस स्थानकात केस दाखल करण्यात आली आहे.(Spurious Liquor Case: गोपालगंज येथे विषारी दारु प्यायल्याने मृतांचा आकडा 8 वर पोहचला)
तक्रारकर्ता ईशान मिया हा रामपुर मधील अजीम नगर येथे राहणार आहे. ते दिल्लीत नोकरी करतो. तर त्याची पत्नी राबिया शमसी रायपुर मध्ये गंज परिसरात आपल्या माहेरी राहते. टी20 वर्ल्ड कप 2021 मॅचमध्ये पाकिस्तानचा विजय झाला. ईशान मियाने पाहिला असता त्याच्या पत्नीने व्हॉट्सअॅपवर स्टेटस म्हणून पाकिस्तानला सपोर्ट करणारे स्टिकर लावले होते. या व्यतिरिक्त राबियाने भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंच्या विरोधात वाईट कमेंट्स ही केल्या होत्या. यामुळेच ईशान हा राबियावर नाराज होत पोलिसात तक्रार करण्यास गेला.
दरम्यान, तक्रारकर्ता ईशान याच्या विरोधात हुंड्याच्या छळाचे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.राबिया शमसीने ईशान मियाच्या विरोधात रामपुरच्या गंज परिसरातील ठाण्यातच हुंड्याच्या छळाचे प्रकरण दाखल केले आहे. असे मानले जात आहे की, याच गोष्टीचा सूड घेण्यासाठी ईशान मियाने आपली पत्नी आणि सासरच्यांचा विरोधात एफआयआर दाखल केली आहे.
तर 24 ऑक्टोंबर 2021 रोजी भारत-पाकिस्तान मध्ये सामना खेळवण्यात आला. तेव्हा पाकिस्तान संघाचा विजय झाल्याच्या आनंदात उत्तर प्रदेशात खुप गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आगरा मध्ये तीन कश्मीरी विद्यार्थ्यांच्या विरोधात सुद्धा देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता.