Unlock 4 Guidelines: केंद्र सरकारने जारी केल्या अनलॉक 4 च्या मार्गदर्शक सूचना; मेट्रो सेवा 7 सप्टेंबरपासून सुरू, 100 लोकांसह सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना परवानगी

त्यानंतर त्यामध्ये वेळोवेळी शिथिलता आणत अनलॉक (Unlock) द्वारे अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता केंद्र सरकारने अनलॉक 4 ची (Unlock 4) घोषणा केली आहे.

Unlock

भारतामध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus) कहर सुरु झाल्यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून देशात लॉक डाऊनची (Lockdown) घोषणा केली होती. त्यानंतर त्यामध्ये वेळोवेळी शिथिलता आणत अनलॉक (Unlock) द्वारे अनेक गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती. आता केंद्र सरकारने अनलॉक 4 ची (Unlock 4) घोषणा केली आहे. शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, गृह मंत्रालयाशी सल्लामसलत करून नगरविकास मंत्रालय/रेल्वे मंत्रालय 7 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने मेट्रो गाड्या चालवणार आहे. अनलॉकची घोषणा जरी झाली असली तरी, कोरोना व्हायरस व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय निर्देशांचे पालन संपूर्ण देशभर केले जाणार असल्याचे केंद्राने सांगितले आहे.

केंद्र सरकरने अनलॉक 4 मध्ये खालील सूचना जारी केल्या आहेत –

> सिनेमा हॉल, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर (ओपन-एअर थिएटर वगळता) आणि तत्सम ठिकाणे.

> प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास (सरकारच्या परवानगीशिवाय)

एएनआय ट्वीट -