Unique Love Story: चुलती पडली 20 वर्षांच्या पुतण्याच्या प्रेमात; तीन वर्षे चालले विवाहबाह्य संबंध, अखेर पतीने लावून दिले लग्न
शनिवारी महिलेच्या पतीने दोघांनाही गावात एकत्र पकडले. नंतर पंचायत बोलावण्यात आली. जिथे दोघांनी एकमेकांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर काकाने आपला पुतण्या व पत्नीचे लग्न लावून दिले.
‘प्रेम आंधळ असते असे म्हणतात’, प्रत्येकालाच याचा अनुभव येतो असे नाही, मात्र बिहारमधून (Bihar) याबाबत एक प्रकरण समोर आले आहे जे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. बिहारच्या जमुईमध्ये 40 वर्षीय चुलती आपल्या 20 वर्षांच्या पुतण्याच्या प्रेमात पडली. या दोघांमधील हे अवैध संबंध सुमारे तीन वर्षांपासून सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या महिलेच्या पतीने म्हणजेच मुलाच्या काकाने या दोघांचे लग्न लावून दिले.
शनिवारी महिलेच्या पतीने दोघांनाही गावात एकत्र पकडले. नंतर पंचायत बोलावण्यात आली. जिथे दोघांनी एकमेकांसोबत राहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर काकाने आपला पुतण्या व पत्नीचे लग्न लावून दिले.
हे संपूर्ण प्रकरण जिल्ह्यातील टाउन पोलीस स्टेशन हद्दीतील लाखापूर गावातील असल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार, महिलेचे 20 वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि तिला 10 वर्षांचा मुलगा आहे. रुबी देवी असे या महिलेचे नाव असून, लाखापूर येथील रहिवासी इंद्रदेव पासवान यांची ती पत्नी आहे. या महिलेचे आपला पुतण्या पंकज पासवानसोबत गेल्या 3 वर्षांपासून अवैध संबंध होते. हे दोघे तीन वर्षे गुपचूपपणे भेटत होते. या दरम्यान पत्नीचे कुठेतरी बाहेर प्रेमप्रकरण असल्याचा संशय पतीला होता, पण तो तिला रंगेहात पकडू शकला नाही. (हेही वाचा: Shocking News: प्रेमासाठी वाटेल ते! सीमा हैदर नंतर भारतीय महिलेने केली 'हद्द पार', प्रियकरासाठी पोहोचली पाकिस्तानात)
मात्र शनिवारी रात्री ही महिला आपल्या प्रियकर पुतण्याला भेटण्यासाठी गेली होती. हा प्रकार पतीला कळताच त्याने स्थानिक लोकांच्या मदतीने दोघांनाही एकत्र पकडले. त्यानंतर पंकज पासवान आणि रुबी देवी हे दोघे एकत्र राहण्याबाबत चर्चा करण्यासाठी पंचायत झाली. त्यानंतर इंद्रदेव पासवानने स्वत: पंचायतीच्या समोर पत्नी रुबी देवी आणि पुतण्या पंकज पासवान यांचा लखापूर गावातील काली मंदिरात हिंदू रितीरिवाजांनुसार लग्न लावून दिले.
(The above story first appeared on LatestLY on Jul 24, 2023 05:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

