Smriti Irani Tests Positive For COVID-19: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याची विनंती

त्याचबरोबर त्यांनी संपर्कात आलेल्यांना कोविडची चाचणी करण्याचेही आवाहन केले आहे.

Smriti Irani (Photo Credits: IANS/File)

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांनी स्वत: ट्विट करतही माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी संपर्कात आलेल्यांना कोविडची चाचणी करण्याची विनंतीही त्यांनी  केली आहे. आपल्या ट्विटमध्ये स्मृती इराणी यांनी लिहिले, ही घोषणा करताना मला शब्द सापडत नाही आहेत. त्यामुळे अगदी सोप्या भाषेत सांगते- "माझी कोविडची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. त्यामुळे संपर्कात आलेल्यांनी लवकरात लवकर चाचणी करुन घेण्याची मी विनंती करते."

सध्या देशात बिहार निवडणूकीचे वारे वाहत आहेत. बिहार निवडणूकीत स्मृती इराणी या भाजप पक्षाच्या स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे प्रचारादरम्यान कोरोनाचा संसर्ग झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. स्मृती इराणी हे वस्त्रोद्योग आणि महिला व बालविकास केंद्रीय मंत्री आहेत. गेल्या आठवड्यात बिहार निवडणुकीसाठी भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

Smriti Irani Tweet:

यापूर्वी देशातील अनेक नेते कोरोना व्हायरसच्या कचाट्यात सापडले आहेत. ऐन निवडणुकीच्या दरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांना कोरोनाची बाधा झाली आहे. दरम्यान, आज बिहार विधानसभा निवडणुकीचे पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. अजून दोन टप्पे बाकी असून 10 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्रालयाच्या लेटेस्ट अपडेट्सनुसार, भारतातील कोरोना बाधितांचा आकडा 80 लाखांच्या जवळ पोहचला आहे. त्यापैकी 72,59,510 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून 6,10,803 सक्रीय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत तब्बल 1,20,010 रुग्णांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.