किराणा दुकानांमध्ये काम करणारे कामगार, भाजी आणि अन्य विक्रेत्यांची COVID19 ची चाचणी घेण्याची राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची सूचना
आता किराणा दुकानांमध्ये काम करणारे कामगार, भाजी आणि इतर विक्रेत्यांची कोरोनाची चाचणी करण्यात यावी अशी सुचना आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना दिली आहे.
देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सरकारकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी स्वत:सह परिवाराची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तर सध्या अनलॉकिंगनुसार काही गोष्टी सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र अटीशर्थींसह दुकाने, मार्केटसह काही गोष्टी सुरु झाल्या आहेत. याच दरम्यान आता किराणा दुकानांमध्ये काम करणारे कामगार, भाजी आणि इतर विक्रेत्यांची कोरोनाची चाचणी करण्यात यावी अशी सुचना आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांना दिली आहे. त्याचसोबत जर त्यांची कोरोनाची चाचणी न केल्यास त्यांच्या मार्फत प्रादुर्शाव परसण्याची शक्यता सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे.
विविध राज्यात सुद्धा कोरोनाचे दिवसागणिक हजारोंच्या संख्येने रुग्णांची भर पडत असल्याने स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत तेथे लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत. पण अत्यावश्यक सेवासुविधा सुरु राहतील असे सुद्धा सांगण्यात आले आहे. तर महाराष्ट्र, पुणे, मुंबई, नवी मुंबईसह औरंगाबाद येथे ही कोरोनाच्या रुग्णांचा आकडा प्रंचड प्रमाणात वाढत असल्याने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.(COVID-19 Vaccine: पुण्याच्या Serum Institute of India चा Bill And Melinda Gates Foundation व Gaviसोबत करार; 2021 पर्यंत 100 मिलियन डोस उपलब्ध करण्याचं लक्ष्य)
दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात मागील 24 तासात कोरोनाचे 61,537 नवे रुग्ण आढळले आहेत. यानुसार देशातील कोरोना बाधितांची एकुण संंख्या 20,88,612 वर पोहचली आहे. यापैकी 6,19,088 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर 14,27,006 बरे झाले आहेत. जर आपण ही आकडेवारी पाहिली तर सध्या कोरोनाबाधितांचा आकडा हा 20 लाखाच्या पार असला तरी मुळ कोरोना रुग्ण हे 6 ते 7 लाखाच्या दरम्यान आहेत. तर बरे होणार्या रुग्णांची संख्या ही अॅक्टिव्ह रुग्णांच्या तुलनेत दुप्पटहुन अधिक आहेत. मागील 24 तासात कोरोनामुळे 933 मृत्यु झाले असुन आजवरच्या कोरोना मृतांची संख्या ही 42,518 वर पोहचली आहे.