Nirmala Sitharaman: मोठ्या आर्थिक पॅकेजची घोषणा होण्याची शक्यता, अर्थमंत्री निर्मला सीतारमण घेणार पत्रकार परिषद
या योजनेंतर्गत पुढच्या पाच वर्षाैंसाठी सुमारे 2 लाख कोटी रुपये कर्च केले जातील. पीएलआय योजनेचा लाभ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, यांसारख्या उत्पादन कंपन्या आमि इतरही काही उद्योगांना होणार आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) आज मोठ्या आर्थिक पॅकेजची (Financial Package) घोषणा करण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री आज (12 नोव्हेंबर) दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत त्या काय घोषणा करतात याकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. कोरोना व्हायरस (Coronavirus ) महामारीमुळे (Coronavirus Pandemic) अडचणीत आलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकार काही योजना आखत आहे. या योजनेंतर्गत हे पॅकेज जाहीर केले जाऊ शकते.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, केंद्र सरकार 1.5 लाख कोटी रुपये म्हणजेच जवळपास 20 अब्ज डॉलर इतक्या पॅकेजची घोषणा करण्याची शक्यत आहे. दरम्यान, Domestic manufacturing उद्योगांना चालना देण्यासाठी केंद्र सरकारने आणखी 10 क्षेत्रांसाठी 2 लाख कोटी रुपये इतके उत्पादन आधारी प्रोत्साहन (PLI) योजना मंजूर केली आहे.
Domestic Manufacturing वाढविण्यासाठी केंद्र सरकारने बुधवारी दूरसंचार, वाहन आणि औषध अशा सुमारे 10 प्रमुख क्षेत्रांमध्ये उत्पादन आधारीत प्रोत्साहन (पीएलआय) योजनेस मंजूरी दिली आहे. या योजनेंतर्गत पुढच्या पाच वर्षाैंसाठी सुमारे 2 लाख कोटी रुपये कर्च केले जातील. पीएलआय योजनेचा लाभ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, यांसारख्या उत्पादन कंपन्या आमि इतरही काही उद्योगांना होणार आहे. (हेही वाचा, देशांतर्गत विमान उड्डाणांची क्षमता 70% पर्यंत वाढवण्यास सरकारची परवानगी; हरदीपसिंग पुरी यांची माहिती)
प्रसारमाध्यमांनी पुढे म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि इतर काही प्रमुख अधिकारी या योजनेला गुरुवारी अंतिम स्वरुप देतील. या पॅकेजमध्ये मागणी वाढविण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी अदिक लक्ष दिले जाणार आहे. गेल्या वर्षीही सरकारने एक पॅकेज देत रोजगार निर्मितीस चालना देण्याचा प्रयत्न केला होता.