Uber COVID Relief Package: उबर कंपनीकडून 3.65 कोटी रुपयांचे मदत पॅकेज जाहीर
अशा काळात मदत म्हणून उबर (Uber) कंपनीने बुधवारी (2 जून) कोविड मदत पॅकेजची (Uber COVID Relief Package) घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये 3.65 कोटी रुपयांच्या मोफत राईड पॅकेजचा समावेश आहे.
कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारीच्या दुसऱ्या लाटेत भारतामध्ये कोरोना संक्रमितांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. अशा काळात मदत म्हणून उबर (Uber) कंपनीने बुधवारी (2 जून) कोविड मदत पॅकेजची (Uber COVID Relief Package) घोषणा केली आहे. या पॅकेजमध्ये 3.65 कोटी रुपयांच्या मोफत राईड पॅकेजचा समावेश आहे. यासोबतच जीवन रक्षक ऑक्सीजन सिलेंडर, कंसेंट्रेटर, वेंटिलेटर इतर महत्त्वपूर्ण चिकित्सा उपकरणांचाही समावेश आहे. उबरसह अनेक बिगरशासकीय संघटनांनी कोरोना काळात मदत जाहीर केली आहे.
ओबर इंडियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंह, यांनी म्हटले आहे की, मला ही घोषणा करताना अत्यंत आनंद होत आहे. अत्यंत जीवघेण्या अशा कोरोना महामारी काळात आम्ही लोकांची मदत करु शकतो आहोत. कोरोना काळात नागरिकांच्या मदतीसाठी आम्ही 3.65 कोटी रुपयांची मदत जाहीर करत आहोत. बिगरशासकीय संघटनांसोबत आमची भागीदारी जनसेवेसाठी आहे. ज्याच्यातून अनेकांचे प्राण वाचले जातील. ही आनंदाची गोष्ट आहे की, देशातील विविध संस्था या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी एकत्र आल्या आहेत. उबर आपले नेटवर्क या कामासाठी वापरु शकतो याचा आम्हाला अभिमान आहे. (हेही वाचा, Uber Mask Verification Selfie: कॅबने प्रवास करणार्यांसाठी मोठी बातमी; उबरने लाँच केले नवे फीचर, मास्कवाला सेल्फी पाठवणे बंधनकारक)
दरम्यान, उबरने या आधी दिल्ली एनसीआर आणि अहमदाबाद येथे मे महिन्यात कोरोना विरुद्ध लढण्यासठी विदेशातील एका संस्थेसोबत भागितादी केली होती. उबरने तीन बिगरशासकीय संस्थाशी कोविड मदतीसाठी भागितारी केली आहे. यात अमेरिकन इंडिया फाउंडेशन, प्रोजेक्ट मुंबई, द गुड क्वेस्ट फाउंडेशन, आदी संस्थांचा समावेश आहे. येणाऱ्या काही काळात उबर अतिरिक्त एनजीओची ओळख पटवेल आणि त्यांच्यासोबत मोफत राईडसह अनेक महत्त्वपूर्ण सेवा मोहिमा सुरु करेन.