येत्या 1 डिसेंबर पासून टीव्ही पाहणे होणार महाग, नागरिकांच्या खिशाला बसणार आणखी एक फटका
कारण काही निवडक चॅनल्सच्या दरात वाढ केली जाणार आहे. त्यामध्ये 50 टक्क्यांनी वाढ केल्यास नागरिकांना अधिक मोजावे लागणार आहेत.
येत्या 1 डिसेंबर पासून टीव्ही पाहणे महागणार आहे. कारण काही निवडक चॅनल्सच्या दरात वाढ केली जाणार आहे. त्यामध्ये 50 टक्क्यांनी वाढ केल्यास नागरिकांना अधिक मोजावे लागणार आहेत. देशातील प्रमुख ब्रॉडकास्टिंग नेटवर्क Zee, Star,Sony, Viacom18 ने आपल्या काही चॅनल्सला TRAI च्या प्रस्तावित बुके लिस्टमधून बाहेर केले आहे. त्यामुळे जर तुम्हाला हे चॅनल्स पहायचे असल्यास 50 टक्के अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.(सामान्य नागरिकांना आणखी एक झटका! साबणांसह डिटर्जेंटच्या किंमतीत वाढ)
सध्या चॅनल्ससाठी नागरिकांना 49 रुपये प्रति महिना द्यावे लागत आहेत. परंतु किंमतीत वाढ झाल्यानंतर त्यासाठी 69 रुपये प्रति महिना द्यावे लागणार आहेत. याच प्रकारे Sony साठी 39 रुपयांऐवजी 71 रुपये, Zee चॅलनसाठी 39 ऐवजी 49 रुपये आणि Viacom18 साठी 26 रुपये प्रति महिन्याऐवजी 39 रुपये मोजावे लागणार आहेत.(नागरिकांना महागाईचा आणखी एक झटका बसणार, लवकरच Insurance Premium मध्ये होणार वाढ)
दरम्यान, टेलिकॉम रेगुलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्याकडून नव्या टॅरिफ ऑर्डर लागू करण्याच्या कारणास्तव टीव्ही पाहणे महागणार आहे.TRAI ने मार्च 2017 मध्ये टीव्ही चॅनेलच्या किमतींबाबत नवीन दर आदेश (NTO) जारी केला होता. TRAI चा विश्वास होता की NTO 2.0 सह, दर्शक फक्त तेच चॅनेल निवडून पैसे देऊ शकतील जे त्यांना बघायचे आहेत. तथापि, अडचण अशी आहे की ज्या चॅनेलचे मासिक मूल्य ब्रॉडकास्टिंग नेटवर्कद्वारे 15-25 रुपयांच्या दरम्यान ठेवण्यात आले होते, त्यांना ट्रायच्या नवीन टॅरिफ ऑर्डरमुळे किमान 12 रुपये निश्चित करण्यात आले होते. त्यामुळे ब्रॉडकास्टर चॅनलचे नुकसान होत होते. त्यामुळे काही लोकप्रिय चॅनेलच्या किमती वाढत आहेत.