Handwara हल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विट; शहीद कर्नल आशुतोष शर्मा, J&K पोलीस उपनिरीक्षक आणि जवानांना वाहिली श्रद्धांजली
त्याला भारतीय सैनिकांनी सुद्धा सडेतोड प्रतिउत्तर दिले. परंतु दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारतीय लष्कराचे 4 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये कर्नल आशुतोष शर्मा यांना सुद्धा वीरमरण आले आहे.
जम्मू-कश्मीर येथील हंडवारा आज दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतीय सैनिकांनी सुद्धा सडेतोड प्रतिउत्तर दिले. परंतु दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत भारतीय लष्कराचे 4 जवान शहीद झाले आहेत. यामध्ये कर्नल आशुतोष शर्मा यांना सुद्धा वीरमरण आले आहे. मात्र या हल्ल्यात 2 दशहतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. याच दरम्यान, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हंडवारा हल्ल्यामधील शहीद कर्नल आशुतोष शर्मा, जम्मू-कश्मीर उपनिरीक्षक आणि जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की. त्यांचे कार्य बहुमोलाचे असून ते न विसरण्यासारखे आहे. ते आपल्या देशासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करतात. मात्र आताच्या घटनेमुळे त्यांच्या परिवाराच्या दुखात सहभागी असल्याचे ही मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय सुरक्षा मंत्री राजनाथ सिंह यांनी सुद्धा शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, जवानांचे शौर्य कधीच न विसरण्यासारखे आहे. शहीद जवानांची घटना अत्यंत दुखत आहे. मात्र त्यांनी दहशवाद्यांना उत्तर देण्यासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न हे बहुमोलाच आहेत. हंडवारा मधील चकमकीत शहीद झालेल्यांना सर्व स्तरातून श्रद्धांजली दिली जात आहे.(Jammu & Kashmir: हंडवारा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीत कर्नल आशुतोष शर्मा यांच्यासहित 3 जवान व 1 पोलिस उपनिरीक्षक शहीद)
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील हंडवारा येथे सुरक्षा दलातील आणि दहशतवाद्यांच्यात रविवारी पहाटेच्या सुमारास चकमक सुरु झाली होती. यावेळी गोळीबार सुरु होताच बचावासाठी 21 राष्ट्रीय रायफल्सचे पथक यावेळी एका नागरिकाच्या घरात शिरले होते, मात्र या घरात काही दहशतवादी अगोदरच घुसून बसले होते, त्यामुळे पथकावर या अतिरेक्यांना गोळीबार करण्याची संधीच मिळाली ज्याला कर्नल आशुतोष शर्मा यांच्या सहित हे चार सैनिक बळी पडले. या हल्ल्याच्या आधी या घरातील नागरिकांना मात्र सैन्याने सुरक्षित बाहेर काढले होते.