India's COVID-19 Stats: भारतामध्ये कोरोना व्हायरस चे 0.29 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर, 1.93 टक्के रुग्ण आयसीयूमध्ये तर 2.88 टक्के रुग्ण ऑक्सिजनवर
कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन (Union Health Minister Harsh Vardhan) यांच्या अध्यक्षेतेखाली शनिवारी उच्चस्तरीय मंत्र्यांच्या (GOM) 20 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे भारत सरकारने सांगितले.
कोरोना व्हायरस (Coronavirus) साथीच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन (Union Health Minister Harsh Vardhan) यांच्या अध्यक्षेतेखाली शनिवारी उच्चस्तरीय मंत्र्यांच्या (GOM) 20 व्या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे भारत सरकारने सांगितले. या दरम्यान, केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या विविध समन्वित प्रयत्नांबाबत मंत्री यांनी समाधान व्यक्त केले. आरोग्यमंत्री बैठकीत म्हणाले की, सध्या कोरोनाचे केवळ 0.29 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आयसीयूमध्ये 1.93% आणि ऑक्सिजनवर 2.88% रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात 9 लाखाहून अधिक नमुन्यांची चाचणी घेण्यात आली.
एकूण 7,52,424 सक्रिय प्रकरणांपैकी साधारण 2,500 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. त्याच वेळी, Empowered Group-1 चे अध्यक्ष यांनी बैठकीत सांगितले की, भारत बायोटेक लस ही झेडस कॅडिलासह (Zydus Cadila’s) दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत आहे, जी व्हायरल डीएनएवर आधारित आहे. ते पुढे म्हणाले की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची ऑक्सफोर्ड लस आधीपासूनच तिसर्या टप्प्यातील चाचणीत आहे.
एएनआय ट्वीट-
भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य मंत्रालयाला कोरोना प्रोटोकॉल आणि प्रतिबंधात्मक उपायांसह संसद आणि विधानसभेच्या सदस्यांसाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया (एसओपी) विकसित करण्याचे निर्देश दिले. (हेही वाचा: 6 राज्यांमध्ये 87 हजारापेक्षा अधिक आरोग्य कर्मचा-यांना Coronavirus ची लागण; महाराष्ट्र अव्वल)
दरम्यान, मागील 24 तासांत 76,472 नवे रुग्ण आढळून आले असून 1,021 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांच्या संख्येने 34 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. सध्या देशात 34,63,973 कोरोना बाधित रुग्ण असून मृतांचा आकडा 62,550 वर पोहचला आहे. त्यापैकी 7,52,424 अॅक्टीव्ह रुग्ण (Active Cases) असून 26,48,999 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)