Telangana Shocker: सुपर मार्केटमध्ये रेफ्रिजरेटर उघडण्याच्या प्रयत्नात चार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; बसला विजेचा धक्का (Watch Video)

मुलीच्या पालकांनी आणि इतर नातेवाईकांनी तिचा मृतदेह घेऊन सुपरमार्केटसमोर निदर्शने केली आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Telangana Shocker: सुपर मार्केटमध्ये रेफ्रिजरेटर उघडण्याच्या प्रयत्नात चार वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; बसला विजेचा धक्का (Watch Video)
Girl Dies While Trying To Open Refrigerator in Supermarket (Photo Credits: X/@TeluguScribe)

तेलंगणा राज्यात एका सुपरमार्केटमध्ये रेफ्रिजरेटर उघडण्याच्या प्रयत्नात एका चार वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. निजामाबाद जिल्ह्यातील नवीपेठ तालुक्यात सोमवारी ही दुःखद घटना घडली. ही संपूर्ण घटना सुपरमार्केटच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ही मुलगी आपल्या वडिलांसोबत सुपरमार्केटमध्ये गेली होती. वडील फ्रीजमध्ये आईस्क्रीम शोधत असताना मुलगी चॉकलेट घेण्यासाठी शेजारील फ्रिजकडे गेली. या फ्रीजच्या दरवाजाला स्पर्श करताच तिला विजेचा धक्का बसला. वडिलांनी ताबडतोब मुलीला रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

आता मुलीच्या पालकांनी आणि इतर नातेवाईकांनी तिचा मृतदेह घेऊन सुपरमार्केटसमोर निदर्शने केली आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणाबद्दल कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (हेही वाचा: Ghaziabad: 'जय माता दी' स्टिकर असलेल्या वाहनाला दंड ठोठावल्याने हिंदू गटाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 02, 2023 08:29 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).