TCS ने जाहीर केली आपल्या कर्मचाऱ्यांसाठी पगारवाढ, 1 ऑक्टोबरपासून होणार लागू; कंपनीचा हेडकाउंट 4.5 लाखाच्या वर

आता कुठे या कंपन्या पुन्हा पूर्वपदावर येत असताना, आता भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने (TCS) आपल्या कर्मचार्‍यांना पगार वाढ (Salary Hike) जाहीर केली आहे.

File image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) काळात देशातीन अनेक मोठ्या कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे. आता कुठे या कंपन्या पुन्हा पूर्वपदावर येत असताना, आता भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेडने (TCS) आपल्या कर्मचार्‍यांना पगार वाढ (Salary Hike) जाहीर केली आहे. 1 ऑक्टोबरपासून ही नवी वाढ लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. कंपनीच्या अहवालानुसार 30 सप्टेंबर 2020 पर्यंत टीसीएसचे एकत्रित हेडकाउंट 453,540 इतके होते. काही महिन्यांपूर्वी कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारवावाढीवर रोख लावली होती.

टीसीएसने गुंतवणूक, अपस्किलिंग आणि नाविन्यपूर्ण प्रशिक्षण पद्धतींवर लक्ष केंद्रित केल्याचा परिणाम आता दिसत आहे. मानव संसाधन, ग्लोबल हेड मिलिंद लकड यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘1 ऑक्टोबरपासून आम्ही पगार वाढ देत आहोत, हे जाहीर करण्यात आम्हाला आनंद झाला आहे. आम्ही फ्रेशर्स ऑनबोर्डिंग सुरू केले आणि दुसऱ्या तिमाहीमध्ये जागतिक पातळीवर आपली भरती वाढविली.’

मात्र, वार्षिक आधारावर कंपनीचा नफा 7.05 टक्क्यांनी घसरला आहे. सप्टेंबर 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा 7,775 कोटी रुपये होता. गेल्या वर्षी सप्टेंबरच्या तिमाहीत तो 8042 कोटी रुपये होता. कंपनीने इक्विटी शेअर प्रती 12 रुपये दराने अंतरिम डेव्हिडंट जाहीर केले आहे. EPIC Systems Corporation प्रकरणात करण्यात आलेल्या 1,218 कोटी रुपयांच्या तरतूदीचा परिणाम कंपनीच्या नफ्यावर झाला आहे. परंतु असे असूनही, कंपनीच्या समायोजित नफ्यात 20.3 टक्क्यांची मजबूत वाढ होऊन ते 8,433 कोटी रुपये राहिला. (हेही वाचा: आता कोरोना विषाणू लस बनवण्याच्या शर्यतीमध्ये Reliance ची उडी; जाणून घ्या कधी सुरु होणार ट्रायल)

दरम्यान, टीसीएसच्या कर्मचाऱ्यांचे दुसऱ्या तिमाहीमध्ये 10.2 दशलक्ष तास लॉग इन झाले, जे आधीच्या तिमाहीपेक्षा 29 टक्के जास्त होते. जवळजवळ 352,000 पेक्षा जास्त कर्मचार्‍यांना अनेक नवीन तंत्रज्ञानावर प्रशिक्षण दिले गेले आहे आणि 427,000 हून अधिक लोकांना Agile Methods वर प्रशिक्षण दिले गेले आहे. टीसीएसने आज म्हटले आहे की, ते 16,000 कोटी रुपयांचे शेअर्स परत खरेदी करतील.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif