Swiggy-Zomato Riders Salary: एखाद्या सॉफ्टवेअर अभियंत्यांपेक्षा अधिक कमावतात स्विगी आणि झोमॅटो रायडर्स; YouTube मुलाखतीमधून समोर आली धक्कादायक माहिती (Video)
या रायडर्सच्या म्हणण्यानुसार, आजकाल ते दर महिन्याला हजारो रुपये कमावतात.
Swiggy-Zomato Riders Salary: आजकाल मोठ्या विद्यापीठातून पदवी मिळवूनही अनेकांना चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही. अशा परिस्थितीत अनेक कर्मचारी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अर्धवेळ काम करू लागतात. त्यामुळे फूड डिलिव्हरीचा व्यवसाय खूप वाढला आहे. पूर्वी स्विगी आणि झोमॅटोचे (Swiggy and Zomato) डिलिव्हरी लोक कमी पेमेंट आणि कामाच्या कठीण परिस्थितीबद्दल तक्रार करायचे, मात्र अलीकडे संशोधनात याबाबत सकारात्मक बाब समोर आली आहे.
'फुल डिस्क्लोजर' यूट्यूब चॅनलने स्विगी आणि झोमॅटो या दोन कंपन्यांच्या रायडर्सची मुलाखत घेतली आणि त्यातून पगाराबाबत क्कादायक माहिती समोर आली. या रायडर्सच्या म्हणण्यानुसार, आजकाल ते दर महिन्याला 40,000 ते 50,000 रुपये कमावतात. हे आयटी कर्मचाऱ्याच्या सरासरी कमाईपेक्षा जास्त आहे. अहवालानुसार, भारतामध्ये फ्रेशर्स आयटी कर्मचाऱ्यांचा सरासरी पगार 20,000 रुपये आहे.
एका रायडरने सांगितले की, त्याने अवघ्या 6 महिन्यांत 2 लाख रुपये जमा केले. झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय म्हणाला, ‘मी दररोज 1500 ते 2000 रुपये कमावतो. तसेच आठवड्यात दहा ते 12 हजार रुपये आणि एका महिन्यात 40,000 ते 50,000 रुपये कमावतो. यासोबतच आम्हाला टिप्स आणि प्रोत्साहनपर लाभांशही मिळतो. टिप्सद्वारे आम्ही महिन्याला 5,000 रुपये कमावतो. पावसाळ्यात आमची कमाई अजून वाढते.’ (हेही वाचा: Economic Survey 2024: सरकारी उपाययोजना आणि RBI च्या हस्तक्षेपामुळे 5.4% वर राहिली, आर्थिक पाहणी अहवालात केंद्राचा दावा)
पहा व्हिडिओ-
हा मुलाखतीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक वापरकर्त्यांनी या कमाईबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. परंतु बहुतेक लोक डिलिव्हरी बॉय बनून करिअर करू इच्छित नाहीत, तर ते काही झटपट पैसे कमवण्यासाठी डिलिव्हरी एजंट बनतात. यासह आयटी इंजिनिअरशी तुलना केली तर डिलिव्हरी बॉयचा पगार 5-10 वर्षांत वाढणार नाही. तसेच या कामात वादही नाही.