सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी वडील CBI चौकशीची मागणी करु शकतात पण बिहार पोलीस तपास करण्यास सक्षम
परंतु दिवसागणिक या प्रकरणात नवं नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. तर काहींनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय (CBI) तपासणी व्हायला हवी अशी मागणी केली आहे.
सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने राहत्या घरी गळफास आत्महत्या केल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला होता. परंतु दिवसागणिक या प्रकरणात नवं नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. तर काहींनी सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय (CBI) तपासणी व्हायला हवी अशी मागणी केली आहे. याच दरम्यान आता सुशांतच्या वडिलांना या प्रकरणी सीबीआय तपासणी करावीशी वाटत असल्यात ते त्यासाठी मागणी करु शकतात. आम्ही सीबीआयच्या चौकशीची मागणी केलेली नाही. कारण बिहार पोलीस या प्रकरणाची तपासणी करण्यास सक्षम असल्याचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटले आहे.
पांडे यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, आमची टीम मुंबई आणि वरिष्ठ एसपी तेथील समकक्षांसोबत सातत्याने संपर्क साधत आहेत. काल आमच्या टीमने गुन्हे शाखेच्या डीसीपी यांची भेटली घेतली असून ते या प्रकरणी मदत करतील. तसेच सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी कोर्टाच्या निकालाची वाट पाहत असून त्यानंतर सर्व कागदपत्रे देणार असल्याचे डीजीपी यांनी स्पष्ट केले आहे.(Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कडक भूमिका; म्हणाले या प्रकरणात बिहार आणि महाराष्ट्रामध्ये भांडणं लावू नका पुरावे असतील तर आम्हाला आणून द्या)
रिया चक्रवर्ती हिने काल एक व्हिडिओ शेअर करुन तिला नक्की न्याय मिळेल असे म्हटले होते. त्यानंतर आता सुशांतच्या वडिलांचे वकील विकास सिंग यांनी यावर असे म्हटले आहे की, रिया काय बोलत आहे त्यापेक्षा तिच जास्त दिसत आहे. तसेच मला असे वाटत नाही की तिने आयुष्यात असा सलावर सूट कधी घातला असेल. ते फक्त स्वत:ला सोज्वळ महिलेचा आव आणण्यासाठी होते असे विकास सिंग यांनी म्हटले आहे. त्याचसोबत उद्धव ठाकरे यांच्यावरुन सुद्धा निशाणा साधत त्यांनी म्हटले आहे की, त्यांना कायदा माहिती नाही. एखादा फौजदारी खटल्यात तक्रारदाराची नव्हे तर सत्य मिळवण्यासाठी खटला चालवणे होय. त्यामुळे बिहार पोलीस हे उद्धव नाहीत. कारण बिहार पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्यात आल्याचे ही विकास सिंग यांनी म्हटले आहे.(सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर रिया चक्रवर्ती हिने सोडले मौन, व्हिडिओ शेअर करत दिले 'हे' स्पष्टीकरण Video)
तर मुंबई पोलिसांकडून सुशांत याच्या आत्महत्येप्रकरणी कसून तपास करण्यात येत आहे. तसेच सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी जवळजवळ 30 पेक्षा अधिक जणांनी आपला जबाब नोंदवला आहे. त्याचसोबत या प्रकरणाचा सीबीआयकडून तपास करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. याच दरम्यान सुशांत सिंह याची मैत्रीण रिया चक्रवती (Rhea Chakraborty) हिने सुद्धा सुप्रीम कोर्टात सीबीआय चौकशीसाठी याचिका दाखल केली होती