Surgical Strike 2 वर भारतीय लष्कराची प्रतिक्रिया, ट्विटर खास कविता

26 फेब्रूवारी दिवशी पहाटे 2.30 मध्ये हवाई हल्ला करण्यात आला.

Indian Army (Photo Credits: Twitter)

भारतासह पाकिस्तानही साखरझोपेमध्ये असताना भारतीय वायुसेनेने पाकव्याप्त (POK) काश्मिरमध्ये हवाई हल्ला केला. 26 फेब्रूवारी दिवशी पहाटे 2.30 मध्ये हवाई हल्ला करण्यात आला. यामध्ये दहशतवादी संघटनांचं तळ उद्धवस्त करण्यात आलं. कोणत्याही पाकिस्तानी नागरिकाला धक्का लावता आणि सैन्याचंही नुकसान न करता एअरस्ट्राईक करण्यात आल्यानंतर भारतीयांनी लष्करी दलाचं कौतुक केलं.सामान्य नागरिकांपासून कलाकार आणि खेळाडूंनीही लष्कराचं कौतुक केलं. वायुसेनेच्या प्रशंसनीय कामगिरीनंतर लष्करानेही ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. Pulwama Terror Attack ते Surgical Strike 2 चा घटनाक्रम,भारतीय वायुसेनेने उद्ध्वस्त केले दहशतवाद्यांचे अड्डे

लष्कराचं खास ट्विट

लष्कराने #IndianArmy आणि #NationFirst असे हॅशटॅग वपरून एक खास फोटो आणि कविता ट्विट केली आहे. निबंधकार रामधारी सिंह यांच्या कविताच्या काही ओळी यामध्ये आहेत.

पाकिस्तानच्या दुष्कृत्यांचा बदला घेतला आहे. अशा अर्थाची ही कविता आहे. याद्बारा लष्कराने पाकिस्तानी कारवायांना प्रत्युत्तर दिले आहे.