Tata Steel Plant Accident: ओडिशात टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये अपघात; अनेक कर्मचारी जखमी

कंपनीकडून त्यांना सर्वतोपरी मदत, सहकार्य केले जात आहेय कंपनी अपघाताचे कारण शोधत असल्याचे त्यांनी सांगितले.

Tata Steel Plant

ओडिशामधील (Odisha) टाटा स्टील पॉवर प्लांटमध्ये (Tata Steel Plant) स्टीम लीक झाले आहे. या अपघातात काही कर्मचारी जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ओडिशातील ढेंकनाल जिल्ह्यातील मेरामुंडलीमध्ये हा अपघात झाला आहे.  या अपघातात ब्लास्ट फर्नेसची पाहणी करणारे कामगार आणि अभियंते जखमी झाले आहेत. गंभीर भाजलेल्या जखमींना तातडीने कटक येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीचे काम सुरू असताना दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला, असे टाटा स्टीलने एका निवेदनात म्हटले आहे. साइटवर काम करणाऱ्या काही लोकांवर त्याचा परिणाम झाला, असे त्यात म्हटले आहे. (हेही वाचा - Air India: महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये प्रवेश दिल्याने एअर इंडियाचा पायलट अडचणीत, वर्षातील दुसरी घटना)

खबरदारीचा उपाय म्हणून जखमींना ताबडतोब प्लांटच्या आवारातील व्यावसायिक आरोग्य केंद्रात आणि नंतर कटक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले, निवेदनात म्हटले आहे की, जखमींना डॉक्टर आणि पॅरामेडिक्स सोबत होते. सर्व आणीबाणी प्रोटोकॉल सक्रिय करण्यात आले होते आणि परिसराची नाकेबंदी करण्यात आली होती, असे स्टील जायंटने सांगितले. "आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसोबत जवळून काम करत आहोत आणि अपघाताचे कारण शोधण्यासाठी अंतर्गत तपास सुरू केला आहे," असे निवेदनात म्हटले आहे, सुरक्षितता ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता राहिली आहे.

टाटा स्टील कंपनीने म्हटले की, या अपघातानंतर त्यांनी पीडित कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे. कंपनीकडून त्यांना सर्वतोपरी मदत, सहकार्य केले जात आहेय  कंपनी अपघाताचे कारण शोधत असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघाताची अंतर्गत चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली.