Air India: महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये प्रवेश दिल्याने एअर इंडियाचा पायलट अडचणीत, वर्षातील दुसरी घटना
Air India Flight (PC - Wikimedia Commons)

एका महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये आमंत्रित केल्याप्रकरणी एअर इंडियाच्या दोन वैमानिकांना निलंबित करण्यात आले आहे. कॉकपिट नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) एअर इंडियाला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर सुमारे एक महिन्यानंतर ही घटना घडली. एअर इंडियाने गेल्या आठवड्यात AI-445 या दिल्ली-लेह विमानाच्या कॉकपिटमध्ये अनधिकृत महिलेला प्रवेश देणाऱ्या दोन अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. केबिन क्रूकडून कॉकपिटचे उल्लंघन केल्याची तक्रार मिळाल्यानंतर एअर इंडिया व्यवस्थापनाने हे पाऊल उचलले.

"एआय-445 पायलटच्या एका महिला मैत्रिणीने नियमांचे पालन न करता कॉकपिटमध्ये प्रवेश केला, दोन्ही पायलटांना एअर इंडियाने ग्राउंड/ऑफ-रोस्टर केले आहे," या घटनेवर प्रतिक्रिया देताना नागरी विमान वाहतूक संचालनालय (DGCA) म्हणाले, "DGCA ला या समस्येची जाणीव आहे आणि प्रक्रियेनुसार या प्रकरणात आवश्यक कारवाई केली जात आहे." "एअर इंडियाने सविस्तर तपासासाठी एक समिती स्थापन केली," असे अधिकाऱ्याने सांगितले.

लेह हवाई मार्ग हा देशातील सर्वात कठीण आणि संवेदनशील हवाई मार्गांपैकी एक मानला जात असल्याने विमानातील प्रवासी आणि क्रू यांच्यासाठी या उल्लंघनामुळे धोका निर्माण झाल्याचे तज्ञांचे मत आहे. आणि तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या अटींचा भंग करणे कायद्यानुसार गुन्हा आहे.

अशाच एका घटनेमुळे व्यावसायिक विमान कंपनी अडचणीत आल्याच्या जवळपास महिनाभरानंतर दोन्ही वैमानिकांविरुद्ध एअर इंडियाने कारवाई केली. यापूर्वी, 27 फेब्रुवारी रोजी दुबई-दिल्ली फ्लाइट दरम्यान एका महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये प्रवेश देणार्‍या वैमानिकाविरुद्ध त्वरित कारवाई न केल्यामुळे डीजीसीएने व्यावसायिक विमान कंपनीला बोलावले होते.

DGCA मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइटच्या एका केबिन क्रू सदस्याने DGCA कडे वैमानिकाने 27 फेब्रुवारी रोजी महिला मैत्रिणीला कॉकपिटमध्ये प्रवेश दिल्याबद्दल तक्रार दाखल केली होती.