स्मृती इराणी यांची कन्या Shanelle Irani चा Arjun Bhalla शी साखरपुडा; जाणून घ्या कोण आहे केंद्रीय मंत्र्यांचा होणारा जावई
स्मृती इराणी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये शनेल आणि अर्जुन अतिशय सुंदर लोकेशनवर दिसत आहेत. यातील एका फोटोमध्ये अर्जुन गुडघ्यावर बसून शनेलला एंगेजमेंट रिंग घालत आहे, तर दुसरा फोटो या दोघांचा एक सेल्फी आहे
अभिनेत्रीनंतर राजकारणी बनलेल्या स्मृती इराणी (Smriti Irani) यांची कन्या शनेल (Shanelle Irani) इराणी हिचा साखरपुडा (Engagement) झाला आहे. स्मृती इराणी यांनी 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. स्मृती इराणी यांची मुलगी शनेलने तिचा दीर्घकाळचा प्रियकर अर्जुन भल्लासोबत (Arjun Bhalla) एंगेजमेंट केली आहे, ज्याची छायाचित्रे भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत. मुलगी शनेलच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर करताना स्मृती इराणी यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ’अर्जुन भल्ला आमच्या वेड्या कुटुंबात स्वागत आहे.’
स्मृती इराणी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये शनेल आणि अर्जुन अतिशय सुंदर लोकेशनवर दिसत आहेत. यातील एका फोटोमध्ये अर्जुन गुडघ्यावर बसून शनेलला एंगेजमेंट रिंग घालत आहे, तर दुसरा फोटो या दोघांचा एक सेल्फी आहे, ज्यामध्ये शनेल अर्जुनसोबत खूप आनंदी दिसत आहे. शनेल ही स्मृती यांचे पती झुबिन इराणी आणि त्यांची पहिली पत्नी मोना यांची मुलगी आहे. शनेल व्यतिरिक्त स्मृती इराणी यांना आणखी दोन मुले आहेत, त्यांची नावे जोहर आणि जोश आहे.
View this post on Instagram
जाणून घ्या कोण आहे अर्जुन भल्ला-
Wikibio नुसार, अर्जुन भल्लाचा जन्म टोरंटो, ओंटारियो, कॅनडा येथे झाला. त्याचे शालेय शिक्षण कॅनडातील ओंटारियो येथे झाले. 2009 ते 2013 पर्यंत, त्याने सेंट मायकल कॉलेज, टोरंटो, कॅनडा येथून विज्ञान पदवी घेतली. 2013 ते 2015 या कालावधीत युनायटेड किंग्डमच्या लीसेस्टर विद्यापीठातून एलएलबी सिनिअर् स्टेटस प्राप्त केला. (हेही वाचा: Hruta Durgule चा Prateek Shah सोबत साखरपुडा संपन्न; Happily Engaged म्हणत दोघांनी शेअर केले रोमॅन्टिक फोटोज)
मे 2014 मध्ये, त्याने टोरंटो, कॅनडातील ब्रेकवॉटर सोल्यूशन्स इंक. येथे काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने ट्रोव्हर्स अँड हॅमलिन्स, लंडन, यूके येथे प्रशिक्षण घेतले. अर्जुनने विविध संस्थांमध्ये इंटर्न म्हणून काम केले. ऑक्टोबर 2014 मध्ये, तो लंडन, यूके येथे Apple Inc. मध्ये सामील झाला. त्यानंतर तो दुबई, संयुक्त अरब अमिराती येथे एका कायदेशीर फर्ममध्ये काम करू लागला.
(The above story first appeared on LatestLY on Dec 26, 2021 02:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

