IPL Auction 2025 Live

आता केंद्रीय शासकीय पुरूष कर्मचार्‍यांनाही मिळणार 730 दिवसांची Child Care Leave

सातव्या वेतन आयोगामध्ये एकेरी पालकत्त्व (Single Parent) असणार्‍या, विधूर आणि घटस्फोट झालेल्या पुरूषांना चाईल्ड केअर लिव्हची सोय देण्यात आली आहे.

730 days of child care leave For Male Employee | Image for representation | (Photo credits: Pixabay)

केंद्रीय कर्माचार्‍यांमध्ये आता स्त्रीयांप्रमाणेच पुरूषांनादेखील चाईल्ड केअर लिव्ह (Child Care Leave)  मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये मुलांना आजारपणात सांभाळण्यासाठी आणि परिक्षांच्या काळात मुलांना वेळ देण्यासाठी पुरूषांना एकूण सर्व्हिसच्या काळामध्ये 730 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. सहाव्या वेतन आयोगापासून सुरू असलेली ही शिफारस आता वास्तवामध्ये उतरली आहे. त्यामुळे पुरूष कर्मचार्‍यांना मोदी सरकारने ही नववर्षाची भेट दिली आहे.

कोणाला मिळणार सुट्टी?

सातव्या वेतन आयोगामध्ये एकेरी पालकत्त्व (Single Parent) असणार्‍या, विधूर आणि घटस्फोट झालेल्या पुरूषांना चाईल्ड केअर लिव्हची सोय देण्यात आली आहे. यामध्ये मुलं 18 वर्षांची होईपर्यंत ही सोय देण्यात आली आहे.

सुरूवातीला केवळ शिफारशीच्या स्वरूपात असणार्‍या या निर्णयावर आता सरकारी मोहर लावल्याने पुरूषांना फायदा मिळणार आहे. स्त्रियांना सीसीएलसोबतच 180 दिवसांची पेड लिव्हदेखील मिळते. पुरूषांना 15 दिवसांची सुट्टी मिळू शकते.