Shocking! व्यक्तीने 23 लाखांना खरेदी केला 'काळा घोडा'; घरी आणल्यानंतर समोर आले धक्कादायक सत्य, गुन्हा दाखल
म्हणजेच एकूण 23 लाख व्यापाऱ्यांना देण्यात आले. मात्र ही फसवणूक समोर आल्यानंतर रमेश यांनी तिघांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे
आजच्या काळात बाजारात कोणतीही वस्तू खरेदी करताना अतिशय सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. जर तुम्ही काळजी घेतली नाही तर तुमची मोठ्या प्रमाणत फसवणूक होऊ शकते. पंजाबमध्ये (Punjab) राहणाऱ्या एका व्यक्तीसोबत अशीच फसवणूक झाली आहे. या व्यक्तीने एका व्यापाऱ्याकडून सुमारे 23 लाखांना काळा घोडा (Black Horse) विकत घेतला होता. परंतु घोड्याला घरी आणून आंघोळ घालताच त्याचा काळा रंग पाण्याने धुवून गेला व घोडा लाल झाला, अशा प्रकारे घोड्याच्या रंगाबाबत या व्यक्तीची फसवणूक झाली आहे. रमेश कुमार असे या व्यक्तीचे नाव आहे.
घोड्यांचा गडद काळा रंग अत्यंत दुर्मिळ आहे. घोडे एकतर फिकट काळे असतात किंवा या काळ्या रंगात इतर कोणते तरी रंग मिक्स असतात. गडद काळ्या घोड्याची किंमत फार असते. तर काळ्या रंगाच्या तुलनेत इतर रंगांचे किंवा मिश्र रंगांचे घोडे स्वस्त मिळतात. पंजाबमधील रहिवासी रमेश कुमार यांना देखील असाच काळा घोडा हवा होता. तो त्यांना एका व्यापाऱ्याकडे मिळाला. त्यांनी तब्बल 23 लाख रुपये देऊन हा घोडा विकत घेतला. मात्र घरी आल्यावर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. (हेही वाचा: Crime: गुडगावमध्ये थप्पड मारल्याचा बदला म्हणून घरमालकाची हत्या, 20 वर्षीय तरुण अटकेत)
पंजाबमधील सुनाम शहरातील संगरूर येथील रहिवासी असलेल्या रमेश कुमार यांनी एका व्यापाऱ्याकडून घोडा विकत घेतला होता. या व्यवहारात तीन जणांचा सहभाग होता. तिघांनी मिळून रमेश यांना काळा घोडा 23 लाख रुपयांना विकला होता. पण या डीलमध्ये मोठी फसवणूक दडलेली आहे हे रमेश कुमार यांना समजू शकले नाही. घरी आणल्यानंतर रमेश यांनी घोड्याला आंघोळ घालताच त्याचा काळा रंग निघून गेला. व्यापाऱ्यांनी लाल रंगाचा घोडा काळा रंग लावून विकला होता.
या डीलमध्ये रमेशने 7 लाख 60 हजारांची रोकड व्यापाऱ्यांना दिली होती व उर्वरित रकमेचे दोन धनादेश दिले होते. म्हणजेच एकूण 23 लाख व्यापाऱ्यांना देण्यात आले. मात्र ही फसवणूक समोर आल्यानंतर रमेश यांनी तिघांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.