Shocking! कोल्डड्रिंकमध्ये आढळली मृत पाल; प्रशासनाने सील केले McDonald’s चे आउटलेट

कॉर्पोरेशनने आउटलेट्सनाला निर्देश दिले आहेत की, त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय परिसरात आउटलेट्स पुन्हा सुरु करता येणार नाही

(Photo Credits: Pixabay)

अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन (AMC) ने शनिवारी सोला येथील मॅकडोनाल्डचे (McDonald’s) आउटलेट सील केले. या ठिकाणी कोल्ड ड्रिंकमध्ये मृत पाल (Dead Lizard) आढळली असल्याचे सांगण्यात आले होते. या घटनेची छायाचित्रे सोशल मीडियावर समोर आल्यानंतर प्रशासनाने कारवाई करत हे आउटलेट सील केले. भार्गव जोशी यांच्या तक्रारीची दखल घेत, कॉर्पोरेशनचे अन्न सुरक्षा अधिकारी देवांग पटेल यांनी अहमदाबादच्या या मॅकडोनाल्डच्या आउटलेटमधून थंड पेयाचे नमुने गोळा केले आहेत.

हे नमुने सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले असून, ‘सार्वजनिक आरोग्य सुरक्षेसाठी’, तत्काळ प्रभावाने हे रेस्टॉरंट सील केले. कॉर्पोरेशनने आउटलेट्सनाला निर्देश दिले आहेत की, त्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय परिसरात आउटलेट्स पुन्हा सुरु करता येणार नाही.

दुसरीकडे मॅकडोनाल्ड्सने एका प्रेस स्टेटमेंटमध्ये म्हटले आहे की. ‘मॅकडोनाल्ड्समध्ये, आम्ही आमच्या सर्व ग्राहकांची सुरक्षा आणि स्वच्छता सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहोत. गुणवत्ता, सेवा, स्वच्छता आणि मूल्य हे आमच्या व्यवसाय ऑपरेशन्सच्या केंद्रस्थानी आहेत. याव्यतिरिक्त, आम्ही आमच्या सर्व मॅकडोनाल्ड रेस्टॉरंटमध्ये 42 कठोर सुरक्षा आणि स्वच्छता प्रोटोकॉल लागू केले आहेत, ज्यात नियमितपणे स्वयंपाकघर आणि रेस्टॉरंटची स्वच्छता यासाठी कठोर प्रक्रियांचा समावेश आहे.’ (हेही वाचा: महाराष्ट्रातील आंबे सातामुद्रापार अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले; सुप्रिया सुळेंनी रेनबो इंटरनॅशनल केले अभिनंदन)

त्यांनी पुढे म्हटले आहे की, ‘अहमदाबादच्या आउटलेटमध्ये कथितपणे घडलेल्या घटनेची आम्ही चौकशी करत आहोत. आम्ही एक चांगले कॉर्पोरेट नागरिक म्हणून अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहोत.’ दरम्यान याआधी कोलकाता येथील मॅकडोनाल्डच्या दुकानात फ्रेंच फ्राईजमध्ये मृत पाल सापडल्याची घटना समोर आली होती. प्रियंका मोईत्रा नावाच्या महिलेने या मृत पालीचा फोटो सोशल मिडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर कोलकाता पोलीस स्टेशनमध्ये एफआयआरदेखील दाखल केला गेला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif