Presidential Election 2022: शरद पवार यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा, खासदार नवनीत राणा यांची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुद्धा द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली

Navneet Rana And Sharad Pawar (Photo Credit - Twitter)

राष्ट्रपती निवडणूकीच्या (Presidential Election 2022) एनडीएच्या प्रमुख उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना भाजपने उमेदवारी दिली असून देशभरातील अनेक पक्ष त्यांना पाठिंबा दर्शवित आहे. महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात असलेल्या शिवसेनेने (Shivsena) देखील त्यांना पाठिंबा दर्शविला आहे. यावर आता खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी म्हटले आहे की शरद पवारांनीही द्रोपदी मुर्मू यांना जाहीर पांठिबा द्याव. नवनीत राणा यांनी म्हणाल्या की, शरद पवार (Sharad Pawar) महाराष्ट्रातील दिग्गज नेते आहेत. आदिवासींना आता सर्वांच्या पाठिंब्याची गरज आहे. प्रथमच आदिवासींमधून एक महिला राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचल्या आहे. त्या भाजपच्या (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) दिलेल्या उमेदवार आहेत असा विचार न करता त्यांना पाठिंबा द्यावा. त्यांचा खडतर प्रवास लक्षात घ्यायला हवा असही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईच्या दौऱ्यावर 

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आज मुंबईत दौऱ्यावर आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांसोबत त्यांची बैठक होणार आहे. शिवसेनेने मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केल्याने त्या मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार का नाही, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. (हे देखील वाचा: BJP Vs Eknath Shinde Group: उद्धव ठाकरे यांना मानता तर त्यांना सोडून आलातच का? निलेश राणे यांचे दीपक केसरकर यांच्यावर टीकास्त्र)

द्रौपदी मुर्मू यांना यशवंत सिन्हा यांचं आव्हान

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना यशवंत सिन्हा यांचं आव्हान आहे. याआधीच अनेक प्रादेशिक पक्षांनी मुर्मू यांना पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे निवडणुकीत मुर्मू यांचं पारड जड दिसत असल्याचे म्हटलं जात आहे.