LIC IPO अर्ज स्वीकारण्यासाठी SBI 8 मे रविवारी देखील खुल्या ठेवणार शाखा
एलआयसी आयपीओ साठी ₹902 ते ₹949 पर्यंतचा प्राईज बॅन्ड आहे.
LIC IPO हा मार्केट मधील सर्वात मोठा आयपीओ लॉन्च झाला आहे. 4 मे पासून खुला करण्यात आलेला आयपीओ 9 मे पर्यंत उपलब्ध असणार आहे. या आयपीओ साठी ₹902 ते ₹949 पर्यंतचा प्राईज बॅन्ड आहे. सध्या विविध स्तरांमधून यासाठी अॅप्लिकेशन अर्ज करता येत आहे. एसबीआय या सरकारी बॅंकेतही LIC IPO स्वीकारले जाणार आहेत. त्यासाठी यंदा 8 मेला एसबीआयच्या ब्रांच खुल्या ठेवल्या जातील असं एसबीआयने ट्वीट करत सांगितलं आहे.
RBI ने LIC IPO साठी सर्व ASBA नियुक्त शाखा खुल्या ठेवण्याचे निर्देश दिल्यानंतर SBI ने ही घोषणा केली आहे. SBI ने LIC कर्मचार्यांसाठी त्यांच्या पाच वर्षांच्या कर्जावरील प्रक्रिया शुल्क माफ केले आहे, जेथे कर्जाच्या रकमेच्या 10% रक्कम कोणत्याही सुरक्षा किंवा हमीशिवाय मार्जिन म्हणून घेतली जाईल. हे देखील नक्की वाचा: LIC IPO GMP: एलआयसी चा ग्रे मार्केट प्रीमियम काय आहे? घ्या जाणून .
पहा ट्वीट
एलआयसी कर्मचाऱ्यांसाठी 1 कोटी 58 लाख शेअर राखीव ठेवण्यात आले आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 2 कोटी 21 लाख शेअर राखीव आहेत. LIC IPO चे 6 मेच्या संध्याकाळ पर्यंत 1.39 पटीने सबस्क्राईब करण्यात आले आहेत. तर पॉलिसीधारकांसाठीचा राखीव कोटा 4.01 पटीने सबस्क्राईब करण्यात आले आहेत. कर्मचाऱ्यांचा राखीव कोटा 3.06 पटीने सबस्क्राईब करण्यात आले आहेत.