SBI ने घटवले MCLR दर, ग्राहकांसाठी होम, ऑटो लोन घेणे झाले स्वस्त

त्यामुळे आता ग्राहकांना होम आणि ऑटो लोन घेणे स्वस्त होणार आहे

SBI बँक (File Photo)

भारतीय रिझर्व्ह बँकेने आर्थिक धोरण जाहिर केल्यानंतर देशातील सर्वात मोठी बँक एसबीआयने त्यांच्या एमसीएलआर दरात कपात केली आहे. त्यामुळे आता ग्राहकांना होम आणि ऑटो लोन घेणे स्वस्त होणार आहे. बँकेने सर्व मॅच्युरिटी टर्म कर्जावरील मार्जिनल फंडाच्या मूल्य-आधारित व्याज दरामध्ये (एमसीएलआर) 0.05% कपात करण्याची घोषणा केली आहे. दरम्यान एसबीआयने सुरु असलेल्या आर्थिक वर्षात नवव्या वेळेस एमसीएलआर दरात घट केली आहे. तर एमसीएलआर दरात 0.05 टक्क्यांनी कपात केली असून 7.85 टक्क्यांवर आला आहे. हे नवे दर 10 फेब्रुवारी पासून लागू करण्यात येणार आहे.यापूर्वी गुरुवारी आरबीआयने आर्थिक वर्षासाठी धोरण जाहिर केल्यानंतर रेपो रेट मध्ये घट न करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या देशात रेपो रेट 5.15 टक्के आहे. तसेच एफडीवरील व्याजदारत कपात केली आहे. तर 1 वर्षापासून ते 10 वर्षावरील एफडीसाठी 0.10 टक्क्यांवरुन 0.50 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच आरबीआयने CRR मध्ये कपातीसाठी सूट देण्यात आली असून ती जुलै 2020 पर्यंत लागू राहणार आहे.(RBI च्या सत्तत नोटांची व नाण्यांची वैशिष्ट्ये, आकार बदलण्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह; सहा आठवड्यात उत्तर देण्याचा आदेश)

तर काही दिवसांपूर्वी एसबीआय यांनी एक नवी योजना सुरु केली आहे. त्यानुसार निर्धारित कालावधीत घराचा ताबा न मिळाल्यास बँक ग्राहकांना त्यांचे होमलोनचे पूर्ण पैसे परत करणार आहे. ही रिफंड योजना ज्यावेळी बिल्डरला ओसी सर्टिफिकेट मिळत नाही तो पर्यंत मान्य असणार आहे. रेशिडेंशल बिल्डर फायनान्स विथ बायर गॅरंटी स्कीम नावाच्या अंतर्गत 2.5 करोड रुपयांचे घराची किंमत असल्यास त्यांना होम लोन मिळणार आहे. यामध्ये मात्र बँकेच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे.