SBI मध्ये 8904 जागांसाठी क्लर्क भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया आणि शैक्षणिक योग्यता

एसबीआय (SBI) बँकेने नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली असून क्लर्कची 8904 रिक्ते पदे भरुन काढणार आहेत.

SBI (Photo Credits-Twitter)

एसबीआय (SBI) बँकेने नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली असून क्लर्कची 8904 रिक्ते पदे भरुन काढणार आहेत. याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, एसबीआयने क्लर्क कॅडर मध्ये ज्युनिअर असोसिएटच्या भर्तीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. तर जे लोक बँकेत नोकरी करण्यासाठी शोध घेत असतील त्यांनी शैक्षणिक पात्रतेनुसार आणि बँकेच्या नियम अटीनुसार अर्ज दाखल करावा असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

तर जाणून घ्या एसबीआय मध्ये नोकरीची संधी आल्याने त्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि शैक्षणिक पात्रता किती असायला हवी. तसेच क्लर्क नोकरीच्या पदासंबंधित अधिक माहितीसुद्धा बँकेच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.(हेही वाचा-SBI च्या गृहकर्जावरील व्याज दर कपात, आजपासून नवे व्याज दर लागू होणार)

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शुल्क:

- जनरल कॅटेगरीसाठी आणि ओबीसीसाठी अर्जासाठी शुल्क 750 असणार आहे.

-एससी,एसटी कॅटेगरी मधील विद्यार्थ्यांसाठी 125 रुपये शुल्क भरावे लागतात.

-यासाठी डेबिट, क्रेडिट कार्ड आणि इंटरनेट बँकिंग पद्धतीने अर्जासाठी शुल्क भरता येणार आहे.

अर्ज शुल्क शेवटची तारीख:

12 एप्रिल पासून या अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर शेवटची तारीख 3 मे 2019 ठेवण्यात आली आहे. तर अर्जात बदल करण्यासाठी सुद्धा 3 मे ही शेवटची तारीख आहे.

परिक्षा वेळ:

एसबीआय क्लर्कसाठी प्री-परिक्षा जून 2019 मध्ये घेण्यात येणार आहे. यासाठी एडमिट कार्ड जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. तर पर एडमिट कार्ड 2019 च्या चौथ्या आठवड्यात जारी होणार असून 10 ऑगस्ट 2019 रोजी मुख्य परिक्षा आयोजित करण्यात येणार आहे.

शैक्षणिक पात्रता:

अर्ज करणाऱ्या व्यक्तिची शिक्षण पात्रता मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून ग्रॅज्यूएशन पूर्ण झालेले असावे.

वयाची अट:

एसबीआयच्या परिक्षेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 20 ते 28 वर्ष असावे.

एसबीआय क्लर्क भरती पत्रिका:

तर वरील अटी आणि नियमांची पूर्तता करुन आजच एसबीआयकडून जाहीर करण्यात आलेल्या नोकरीची संधीचा सदुपयोग करा. तसेच अधिक माहिती हवी असल्यास एसबीआयच्या संकेतस्थळावर जाऊन पाहा.