Sarkari Naukri: UPSC अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरती, जाणून घ्या अर्जप्रक्रिया
कारण संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. तर असिस्टंट इंजिनिअर, डिप्युटी डायरेक्टर, चीफ डिझायनर सारख्या अन्य 85 रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण संघ लोक सेवा आयोग (UPSC) अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. तर असिस्टंट इंजिनिअर, डिप्युटी डायरेक्टर, चीफ डिझायनर सारख्या अन्य 85 रिक्त पदांवर योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक असलेल्या उमेदवारांनी upsc.gov.in किंवा upsconline.nic.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी सर्व सुचना आणि अटीं व्यवस्थित वाचाव्यात. अर्ज प्रक्रिया सुरु झाली असून त्याची शेवटची तारिख 2 एप्रिल रात्री 12 वाजेपर्यंत आहे.
अर्ज करण्यात आलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा घेतली जाणार आहे. या लेखी परिक्षेतून पास झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. तर आरक्षित उमेदवारांसाठी या नोकर भरतीच्या प्रक्रियेत 50 टक्के आणि ओबीसीसाटी 45, एससी, एसटी आणि पीएच श्रेणीसाठी 40 टक्के गुण अत्यावश्यक आहेत.असिस्टंट इंजिनिअर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 वर्ष असावे. तर असिस्टंट डायरेक्टर आणि डिप्युटी सुप्रीडेंट पदासाठी वय 35 वर्ष असणे अनिवार्य आहे. डिप्युटी डायरेक्टर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 40 ते 43 वर्ष आणि चीफ डिझायनर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय अधिकाधिक 50 वर्ष असावे. तर उमेदवारांची निवड ही त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेनुसार केली जाणार आहे.(SBI Clerk Recruitment 2020: एसबीआयमध्ये क्लर्क पदांसाठी 3387 जागांची नोकरभरती; जाणून घ्या पात्रता व कुठे कराल अर्ज)
तर केंद्रात लवकरच 7 लाख रिक्त पदांची भरती होणार असल्याची माहिती राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली आहे. गेल्या वर्षाच्या अखेरीस केंद्रात एकून 6 लाख 83 हजार 823 रिक्त पदे आहेत. यातून 5 लाख 74 हजार 289 पद ग्रुप सी साठी रिक्त आहेत, तर 89 हजार 638 पदे बी ग्रुपसाठी आणि ग्रुप ए साठी 19 हजार 896 रिक्त पदे आहेत. बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढले असून या संख्येत घट करण्यासाठी सरकारकडून अधिक प्रयत्न केले जात आहेत.