Sabarmati Express Derail: कानपूरजवळ साबरमती एक्स्प्रेस रुळावरून घसरली, सर्व प्रवासी सुरक्षित (Watch Video)
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना बसने कानपूरला पाठवले जात आहे. अपघातस्थळ आणि नियंत्रण कार्यालयात वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. अपघात निवारण वाहनही रवाना झाले आहे.
Sabarmati Express Derail: वाराणसी (Varanasi) हून अहमदाबाद (Ahmedabad) ला जाणारी साबरमती एक्स्प्रेस (Sabarmati Express) रात्री अडीचच्या सुमारास कानपूर (Kanpur) च्या गोविंदपुरीसमोर रुळावरून घसरली. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनचे 20 डबे रुळावरून घसरले आहेत. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. रेल्वे, पोलीस आणि अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदत आणि बचाव कार्य सुरू केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला आहे. या अपघातात एकही प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, या घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे विभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून डबे रुळावर आणण्याचे काम सुरू आहे.
रेल्वे तज्ज्ञांच्या पथकाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती करून रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा सविस्तर तपास केल्यानंतर अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनेनंतर डीआरएम, एडीआरएम, कमर्शियल हेड, टेक्निकल हेड, मेडिकल टीमसह वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. (हेही वाचा - Goods Train Derailed in West Bengal: पश्चिम बंगालमध्ये मालगाडीचे 5 डबे रुळावरून घसरले; रेल्वे वाहतूक विस्कळीत (Watch Video))
दरम्यान, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, 'साबरमती एक्स्प्रेसचे (वाराणसी ते अहमदाबाद) इंजिन आज पहाटे 02.35 वाजता कानपूरजवळ ट्रॅकवर ठेवलेल्या वस्तूला आदळल्याने रुळावरून घसरले. या अपघाताचा पुरावा सुरक्षित आहे. आयबी आणि यूपी पोलिसही यावर काम करत आहेत. प्रवाशांना किंवा कर्मचाऱ्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.' (हेही वाचा -West Bengal Goods Train Derailed: पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघात, राणाघाटात मालगाडी रुळावरून घसरली, पाहा व्हिडिओ)
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे ट्विट -
अपघातानंतर रेल्वे जारी केले हेल्पलाइन क्रमांक -
- प्रयागराज 0532-2408128, 0532-2407353
- कानपूर 0512-2323018, 0512-2323015
- मिर्झापूर 054422200097
- इटावा 7525001249
- टुंडला 7525001249
- अहमदाबाद 07922113977
- बनारस सिटी 8303994411
- गोरखपुर - 0551-2208088
- लखनऊ - 8957024001
पहा व्हिडिओ -
रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांची व्यवस्था -
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना बसने कानपूरला पाठवले जात आहे. अपघातस्थळ आणि नियंत्रण कार्यालयात वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. अपघात निवारण वाहनही रवाना झाले आहे. रेल्वे प्रशासनाने घटनास्थळी चहा आणि पाण्याची व्यवस्था केली असून प्रवाशांना बस, इतर रस्त्यावरील वाहने आणि विशेष मेमू ट्रेनने कानपूर सेंट्रल स्टेशनवर आणले जात आहे. याशिवाय, कानपूर सेंट्रल स्टेशनवर एका विशेष ट्रेनचीही व्यवस्था करण्यात आली आहे जी या सर्व प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी घेऊन जाईल.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)