RTGS Fund Transfer डिसेंबर 2020 पासून 24 तास खुली होणार; RBI गर्व्हनर शक्तिकांत दास यांची माहिती
आता आर्थिक व्यवहारांमध्ये RTGS ही पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा डिसेंबर 2020 पासून 24 तास खुली केली जाईल अशी माहिती दिली आहे.
भारतामध्ये आज आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI Governor Shaktikanta Das) यांनी द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे. यावेळेस त्यांनी आता आर्थिक व्यवहारांमध्ये RTGS ही पैसे ट्रान्सफर करण्याची सुविधा डिसेंबर 2020 पासून 24 तास खुली केली जाईल अशी माहिती दिली आहे. दरम्यान भारतामध्ये RTGS अंतर्गत कमीत कमी 2 लाख रूपये बॅंकांच्या कार्यकालीन वेळेत ट्रान्सफर करण्याची मुभा आहे.
बॅंकांच्या आर्थिक व्यवहारांमध्ये फंड्सच्या इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरद्वारा एका अकाऊंट मधून दुसर्या अकाऊंटमध्ये पैसे देण्या-घेण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने RTGS आणि NEFT करून पैसे ट्रान्सफर केले जातात. दोन्ही सेवा या आरबीआयकडून सांभाळल्या जातात.
ANI Tweet
आज शक्तिकांत दास यांनी माहिती देताना आता भारतीय नागरिकांना आर्थिक व्यवहार अधिक सुरळीत आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने RTGS ही सेवा 24 तास आणि सारे दिवस खुली करण्याचा निर्णय झाला असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (NEFT) या रिटेल पेमेंट सिस्टममध्ये मागील वर्षी बदल करत ती 24 तास खुली करण्यात आली आहे. तर IMPS ही रिअल टाईम पेमेंट सर्व्हिस सुट्टीच्या दिवशी देखील आर्थिक व्यवहारांसाठी खुली असते. त्यामध्ये अप्पर लिमिट म्हणजे कमाल 2लाखांची मर्यादा आहे तर किमान मर्यादा देण्यात आलेली नाही.