RRB Recruitment 2019: दक्षिण मध्य रेल्वेत नोकर भरती, 10 वी पास उमेदवार करु शकतात अर्ज
कारण दक्षिण मध्ये रेल्वेत नोकरी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीच्या अर्जाची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2019 ठेवण्यात आली आहे.
जर तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असल्यास तुमच्यासाठी खुशखबर आहे. कारण दक्षिण मध्ये रेल्वेत नोकरी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीच्या अर्जाची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2019 ठेवण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेत 4,103 रिक्त पदांवर नोकर भरती करण्यात येणार आहे. तर दक्षिण मध्य रेल्वेत नोकर भरतीसाठी 10 वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.
नोकरभरती एमएमडब्लू, एमएमटीएम, पेंटर, एसी मॅकानिक, इलेक्ट्रिकल, कारपेन्टर, डिझेल मशीन, इलेट्रिशनस, इलेक्ट्रॉनिक मशीन, फिटर, मॅकानिस्ट आणि वेल्टर पदासाठी असणार आहे. तर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे 10 वी पास सर्टिफिकेश आणि आयटीआय संबंधित प्रमाणपत्र असावे.(Indian Army मार्फत मिलिटरी नर्सिंग कोर्स पदांच्या 220 जागांसाठी भरती)
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 24 वर्ष असावे अशी अट ठेवण्यात आली आहे. तर उमेदावारीच निवड गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी तारिख 9 नोव्हेंबर पासून सुरु झाले आहेत. त्यामुळे जर तुम्ही शोधात असाल, आणि आपल्याला अद्याप नोकरी मिळाली नसेल, व आपण रेल्वेत काम करण्यास इच्छुक असाल तर आपल्यासाठी ही महत्वाची बातमी असू शकते. त्यामुळे तुम्ही जर या नोकरीसाठी अर्ज करणार असल्यास त्याबाबत अधिक माहिती तुम्हाला https://scr.indianrailways.gov.in. येथून मिळणार आहे.