Religious Conversion: '...तर एक दिवस देशातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्याक होईल'; धर्मांतरावर अलाहाबाद उच्च न्यायालयाची मोठी टिपण्णी

कैलासवर बेकायदेशीर धर्मांतराच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Allahabad High Court (Photo Credit: Wikimedia Commons)

धर्मांतर प्रकरणाच्या (Religious Conversion) प्रवृत्तीवर अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) गंभीर टिप्पणी केली आहे. उच्च न्यायालयाचे म्हणणे आहे की, धार्मिक मेळाव्यात धर्मांतराचा ट्रेंड असाच सुरू राहिला तर एक दिवस भारतातील बहुसंख्य लोकसंख्या अल्पसंख्याक होईल. धर्मांतर करणाऱ्या धार्मिक मेळाव्यांवर तात्काळ बंदी घालावी, असे न्यायालयाने म्हटले आहे. अशा घटना घटनेच्या अनुच्छेद 25 द्वारे दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या अधिकाराच्या विरोधात असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. घटनेच्या या कलमामुळे कोणत्याही व्यक्तीला त्याच्या धर्माचे पालन, उपासना आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. मात्र धर्माचा प्रसार करण्याचे स्वातंत्र्य कोणालाही धर्मांतर करण्यास परवानगी देत ​​नाही.

अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांनी उत्तर प्रदेश बेकायदेशीर धार्मिक परिवर्तन प्रतिबंध कायदा, 2021 अंतर्गत मौदाहा, हमीरपूर येथील रहिवासी आरोपी कैलाशचा जामीन अर्ज फेटाळताना ही टिप्पणी केली. कैलासवर बेकायदेशीर धर्मांतराच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. तक्रारदार रामकली प्रजापतीने एफआयआरमध्ये म्हटले होते की, कैलासने त्यांचा भाऊ रामफलाला दिल्लीतील एका सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नेले होते.

या कार्यक्रमात गावातील अनेक लोकांनाही नेले होते. नंतर सर्वांना आमिष दाखवून ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यात आला. रामकली यांच्या म्हणण्यानुसार त्यांचा भाऊ मानसिक आजारी होता. या प्रकरणात अटक झाल्यानंतर तक्रारदाराच्या भावाचे धर्मांतर केले नसल्याचा युक्तिवाद कैलासच्या वकिलाने केला. त्यांनी सांगितले की, पास्टर सोनूने हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्यानेच सर्वांचे धर्मांतर केले. त्याची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. (हेही वाचा: Rahul Gandhi Criticizes PM Narendra Modi: नरेंद्र मोदी सत्य हटवू शकता, पुसू शकत नाहीत; भाषणातील भाग वगळल्यानंर राहुल गांधी यांचा आक्रमक पलटवार)

राज्य सरकारचे अतिरिक्त महाधिवक्ता यांनी युक्तिवाद केला की, अशा सभा आयोजित करून लोकांना मोठ्या प्रमाणावर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडले जात आहे. मात्र खेड्यापाड्यातील लोकांना ख्रिश्चन बनवण्यात कैलासचा सहभाग आहे. त्याबदल्यात त्याला भरपूर पैसे देण्यात आल्याचा दावाही केला जात आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, घटनेचे कलम 25 कोणालाही स्वेच्छेने धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य देत असले तरी, परंतु कुणालाही आमिष दाखवून धर्मांतर करण्याची परवानगी देत ​​नाही. एखाद्या धर्माचा प्रचार करणे म्हणजे इतर कोणत्याही धर्माच्या लोकांना आपल्या धर्मात बदलणे असा होत नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif