RBI's New Rules for Debit and Credit Cards: आरबीआय कडून डेबिट आणि क्रेडिट कार्ड संबंधित नियमात बदल, 30 सप्टेंबर पासून होणार लागू
जर तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करत असल्यास तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण येत्या 30 सप्टेंबर 2020 पासून RBI डेबिट आणि क्रेडिट कार्ड संबंधित नियमात बदल होणार आहे. आरबीआयकडून एका विधानात असे म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीसाठी आता परवानगी घ्यावी लागणार आहे.
जर तुम्ही डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर करत असल्यास तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. कारण येत्या 30 सप्टेंबर 2020 पासून RBI डेबिट आणि क्रेडिट कार्ड संबंधित नियमात बदल होणार आहे. आरबीआयकडून एका विधानात असे म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय देवाणघेवाणीसाठी आता परवानगी घ्यावी लागणार आहे. या व्यतिरिक्त ऑनलाईन देवाणघेवाण, कार्ड नसल्यास देवाणघेवाण आणि कॉन्टेक्टलेस देवाणघेवाणीसाठी कार्ड वरील सेवांसाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीने सेट करावे लागणार आहे.(Income Tax Return Filing: आर्थिक वर्ष 2018-19 च्या ITR रिटर्न भरण्यासाठी केवळ 15 दिवस बाकी; e-verification साठी 30 सप्टेंबर शेवटची तारीख)
नवे नियम जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात आले होते. पण कोरोना व्हायरसमुळे हे नियम लागू करण्यासाठी 30 सप्टेंबर पर्यंतचा कालावधी दिला होता. तर जाणून घ्या कार्डहोल्डर्ससाठी कोणते कोणते निमय बदलण्यात आले आहेत. आरबीआयने बँकांना सांगितले आहे की, भारतात कार्ड जाहीर करताना एटीएम आणि PoS वर फक्त डोमेस्टिक कार्डचा वापर करण्याची परवानगी द्यावी.
आरबीआयच्या नव्या नियमानुसार आंतराराष्ट्रीय देवाणघेवाणीसाठी आता स्वतंत्रपणे परवानगी घ्यावी लागणार आहे. ग्राहकांना आपल्या गरजेनुसार परवानगी घेऊ शकतात. म्हणजेच तुम्हाला तुमच्या कार्डच्या माध्यमातून देशाअंतर्गत ट्रान्जेक्शन किंवा आंतरराष्ट्रीय ट्रांन्जेक्शन. याचा निर्णय सुद्धा ग्राहकांना घेता येणार आहे. ग्राहकांना कधी कधी ATM कार्ड ट्रान्जेक्शन हे ऑन किंवा ऑफ ही करता येणार आहे.(ATM Cash Withdrawal Rule: स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या एटीएम मधुन 10 हजाराच्या वर रक्कम काढताना 18 सप्टेंबर पासुन लागु होणार 'हा' नियम)
या व्यतिरिक्त ग्राहक आपल्या ट्रान्जेक्शनची लिमिट सुद्धा बदलू शकतात. ग्राहक मोबाईल अॅप, इंटरनेट बँक, एटीएम मशीनच्या मदतीने, आयवीआरच्या माध्यमातून ट्रान्जेक्शन लिमिट ठरवू शकतात. त्यानुसार कोणती सर्विस अॅक्टिव्ह करयाची किंवा डिअॅक्टिव्ह करण्याचा निर्णय सुद्धा आपल्याला घेता येणार आहे. RBI कडून जाहीर केलेले एटीएम आणि क्रेडिट कार्ड संबंधित नियम 30 सप्टेंबर 2020 पासून लागू होणार आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)