राजस्थान: आरोग्य विभागाचा मोठा निष्काळजीपणा उघडकीस, महिलेला एकाच वेळी दिले लसीचे दोन्ही डोस

येथे एका महिलेला लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत. देशातील हे पहिलेच प्रकरण असून एखाद्याला अवघ्या 10 मिनिटांत एकाच वेळी लसीचे दोन डोस दिले आहेत.

Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

राजस्थान (Rajasthan)  मधील दौसा येथील आरोग्य विभागातील एक मोठा निष्काळजीपणा समोर आला आहे. येथे एका महिलेला लसीचे दोन्ही डोस दिले गेले आहेत. देशातील हे पहिलेच प्रकरण असून एखाद्याला अवघ्या 10 मिनिटांत एकाच वेळी लसीचे दोन डोस दिले आहेत. खरंतर शुक्रवारी दौसा जिल्ह्यातील काही सेंटर्सवर 18 ते 44 वर्षादरम्यानच्या नागरिकांना लस दिली जात आहे. तसेच लसीकरणासाठी ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन केले जात आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नांगल बेरसी लसीकरण सेंटरवर सुद्धा ऑफलाइन पद्धतीने लस दिली जात आहे.

याच दरम्यान, खेरवार गावात राहणाऱ्या एका 43 वर्षीय किरण शर्मा या आपल्या पती आणि मुलीसह लसीकरण केंद्रावर पोहचल्या. ज्यावेळी त्या लस घेण्यासाठी आल्या तेव्हाच त्यांना तेथे असलेल्या आरोग्य प्रतिनिधींनी लस दिली. त्यानंतर आरोग्य कर्मचारी लसीकरण सेंटरवर आधार कार्डचे वेरिफिकेशन करु लागले. वेरिफिकेशन केल्यानंतर त्याच आरोग्य कर्मचाऱ्याने किरण शर्मा यांना लसीटा आणखी एक डोस दिला. 10 मिनिटांत तिला 2 डोस दिल्यानंतर ती घरी परतली.(Online Fraud: ब्लॅक फंगस इंजेक्शन विक्रीच्या नावाखाली हैद्राबाद येथील व्यक्तीला तब्बल 8 लाखांचा गंडा) 

असे सांगितले जात आहे की, महिलेला माहिती नव्हती की लस एकदाच दिली जाणार आहे की दुसऱ्यांदा सुद्धा. महिला घरी परतल्यानंतर तिने नवऱ्याला सांगितले की, तिला दोन वेळा लस दिली आहे. तेव्हा घरातील सर्व सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. शनिवारी सकाळ पर्यंत तिच्यावर दोन्ही डोसचा कोणताच परिणाम दिसून आला नाही. परंतु महिलेमध्ये भीती निर्माण झाली आहे.(COVID-19 In India: भारतामध्ये नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये घसरण कायम; मागील 24 तासांत 1.73 लाख जणांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह)

दुसऱ्या बाजूला आरोग्य केंद्र नांगल बेरसीच्या कर्मचाऱ्यांनी म्हटले की, त्यांनी कोणालाही दोन वेळा लसीचा डोस दिलेला नाही. रुग्णालयाचे इंचार्ज डॉ. नीलम मीना यांचे असे म्हणणे आहे की, पहिल्या वेळेस रक्त आल्याने दुसऱ्यांदा लस दिल्याचे सांगत आपला बचाव करत आहेत. तर पीडित महिलेचे असे म्हणणे आहे की, तिला दोन वेळाच लसीचा डोस दिला गेला आहे. यावर काय म्हणावे की, नागरिकांमध्ये जागृकतेची कमी की आरोग्य विभागाचा निष्काळजीपणा. हे आता तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.